Friday, May 16, 2025
HomeFeatured PostsStd 11 Admission Process

Std 11 Admission Process

Std 11 Admission Process – See online admission process

शासन आदेशानुसार मुंबई (MMRDA), पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका सोबतच इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दती राज्यभर राबविण्याबाबत शासन मान्यता देण्यात आली आहे.

As per the government resolution, the government has approved the implementation of Std 11 Central Online Admission System across the state, along with the Municipal Corporations of Mumbai (MMRDA), Pune, Pimpri-Chinchwad, Amravati, Nagpur and Nashik.

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्यात येणार आहेत.

From the academic year 2025-2026, admission to Std 11 in all recognized higher secondary schools/junior colleges in the state of Maharashtra will be done through the central online admission system.


कोणते कनिष्ठ महाविद्यालय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवतील ?

Which junior colleges will implement online admission process?

सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवणे आवश्यक राहील.

From the academic year 2025-2026, it will be mandatory for all recognized higher secondary schools/junior colleges in the state of Maharashtra to implement the online admission process.


See Government Resolution-

Date- 25 Feb. 2025


How will the process start?

Every Higher Secondary school / Junior College has to register college giving all information of college along with the intake capacity of students for Arts, Science, Commerce faculty.

प्रत्येक उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाने महाविद्यालयाची नोंदणी करावी लागेल आणि कला, विज्ञान, वाणिज्य विद्याशाखेतील विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आणि महाविद्यालयाची सर्व माहिती द्यावी लागेल.

See the User Manual for Registration-


New information about admission process-

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया :-

राज्यातील सर्व क्षेत्राकरीता उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय यांचेशी संलग्न सर्व शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतुदी लागु राहतील.

राज्यातील अल्पसंख्यांक दर्जासह अन्य सर्व उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतूदी लागु राहतील.

शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून राज्यातील राज्यमंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रीय पध्दतीने व ऑनलाईन प्रणाली द्वारा करण्यात यावे.


शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून HSVC व्यवसायिक चे प्रवेश ऑफलाईन पध्दतीने होतील.

HSVC Vocational admissions will be done offline from the academic session 2025-26.


खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालय यांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे वरीष्ठ कार्यालयांना उपलब्ध करून देणे, विहित मुदतीत माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे, इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अनुषंगिक कामकाज विहित मुदतीत करणे, याबाबत शाळा स्तरावरील कामकाज पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी खाजगी व्यवस्थापनाची असेल.

विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान शाखांपैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल. विद्यार्थाना कोणत्याही एका शाखेकरीता अर्ज करता येईल.


See Government Resolution-

Date- 6 May 2025


Read More-

Tenses uses and examples

Parts of Speech

Nouns

Pronouns

TAIT Exam

Important G. R.


Official Website for Std 11 Admission-

इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

After the online results of Std 10 are declared, students will be provided with the facility to fill the priority list for Class 11 admission.

सर्व प्रवेश इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे करण्यात येतील.

All admissions will be made on the basis of class 10th marks.

राज्य मंडळ संलग्नित इयत्ता १० वी मधील विषयांच्या उच्चतम ५ विषयांचे गुण गुणवत्तेकरीता विचारात घेण्यात यावेत.

The marks in the highest 5 subjects in class 10th affiliated to the state board should be considered for merit.

राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांच्या माध्यमिक स्तरावरील इयत्ता १० मधील माहिती व तंत्रज्ञान किंवा तत्सम विषय वगळता अन्य ५ विषयांमधील उच्चतम गुण हे गुणवत्तेकरीता विचारात घेण्यात येतील.

The highest marks in 5 subjects other than Information and Technology or similar subjects in Class 10 of secondary level of boards other than the State Board will be considered for merit.



Std.11 Online Admission Process-

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठीचे अधिकृत संकेतस्थळ https://mahafyjcadmissions.in अखेर सुरू करण्यात आले आहे.

The official website for Class XI admissions -https://mahafyjcadmissions.in – has finally been launched by the state’s School Education Department.

संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करता येणार नोंदणी दि.9 मे 2025 पासून सुरु झाली आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालय या वर आपापल्या कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध शाखा, विषय व प्रवेशासाठी विद्यार्थी संख्या यांची माहिती भरून माहिती सबमिट करणार आहेत.

Junior colleges can register on the website. Registration has started from May 9, 2025. All junior colleges will submit information on this portal by filling in the details of the branches, subjects and number of students for admission available in their respective junior colleges.

विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया येत्या 19 मे पासून सुरू होणार आहे. विद्यार्थी व पालकांनी शिक्षण विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

The student registration process will begin from May 19. The Education Department has appealed to students and parents to register by visiting the official website of the Education Department.


Official Website for Std. 11 Registration

Registration Portal (Click Here)


Time Table – Std 11 Admission Process

अकरावी प्रवेशासाठी वेळापत्रक-

विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रोफाईल तयार करणेदिनांक १९ मे ते २८ मे २०२५
विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरणे.दिनांक १९ मे ते २८ मे २०२५

Online Admission process Fee for students-

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शुल्क-

Rs. 100 (Non – refendable)


Important Information for Students-

१) मोबाईलवर वापरण्यायोग्य संकेतस्थळ व मोबाईल अॅप उपलब्ध होणार.

२) विद्यार्थ्यास लॉगिन आयडी व पासवर्ड ऑनलाइन वेळी ऑनलाइन मिळणार तसा संदेश दिलेल्या मोबाईलवर येईल.

३) विद्यार्थ्यांना अर्ज आपल्या घरूनच भरता येणार मोबाईल अॅप मधून अर्ज भरणे माहिती पुस्तिका वाचणे प्रवेश प्रक्रियेची शुल्क भरणे असे विविध कामकाज करता येईल.

४) कागदपत्रे अपलोड करून अर्ज ऑनलाईनच प्रमाणीत होणार.

५) प्रवेश प्रक्रिया शुल्क ऑनलाईनच भरता येईल.

६) शाळा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालय यांना फोनवरून संपर्क साधता येईल.

७) अडचणींच्या निराकरणासाठी कॉल सेंटर अथवा हेल्पलाइन व ऑनलाइन शंका समाधान सुविधा.

८) प्रत्येक कारवाईची सूचना एस. एम. एस. द्वारे मिळेल. ९) प्रत्येक फेरीचे कट ऑफ गुण पाहता येतील.


Reservation-

संविधानिक / सामाजिक आरक्षणांतर्गत राखीव जागा (बिगर अल्पसंख्यांक शाळा)

क्र.प्रवर्गआरक्षित जागा
१)अनुसूचित जाती (SC)१३%
२)अनुसूचित जमाती (ST)०७%
३)विमुक्त जाती -अ (VJ-A)०३%
४)भटक्या जमाती ब (NT-B)२.५%
५)भटक्या जमाती क (NT-C)३.५%
६)भटक्या जमाती ड (NT-D)०२%
७)विशेष मागास प्रवर्ग (SBC)०२%
८)इतर मागासवर्गीय (OBC)१९%
९)आर्थिक दुर्बल घटक (EWS)१०%
१०)खुल्या प्रवेशासाठी३८%

कोटा निहाय राखीव जागा

क्र.कोटाअल्पसंख्यांक संस्थांच्या उच्च माध्यमिक विद्यालयबिगर अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय
१)इन हाऊस कोटा१०%१०%
२)व्यवस्थापन कोटा५%५%
३)अल्पसंख्यांक कोटा५०%लागू नाही

समांतर आरक्षण / विशेष आरक्षण प्रवर्ग

क्र.विशेष आरक्षणअल्पसंख्यांक संस्थांच्या उच्च माध्यमिक विद्यालयबिगर अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय
१)महिला३०%३०%
२)दिव्यांग अपंग४%४%
३)प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त५%५%
४)अ) बदलीने आलेल्या राज्य शासन/ केंद्र शासन/ खाजगी क्षेत्रातील कर्मचारी यांचे पाल्य.  
ब) आजी माजी सैनिकांच्या पत्नी/ पाल्य/ स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य.  
क) आंतरराष्ट्रीय स्वरावरील स्पर्धामध्ये विजेते सहभागी खेळाडू विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदक विजेते खेळाडू
५%५%
५)अनाथ मुले (खुल्या प्रवर्गातून)१%१%
६)उर्वरित जागा (शुद्ध प्रवर्ग)५५%५५%

शालेय शुल्क –

१) उच्च माध्यमिक विद्यालयातील अनुदानित तुकडील साठी शासन नियमाप्रमाणे शुल्क आकारले जाते.

२) विनाअनुदानित स्वयंअर्थसाईट कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांची शुल्क संबंधित व्यवस्थापना मार्फत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनी यमन अधिनियम २०११ नुसार निश्चित केले जाते त्यामुळे वेगवेगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे शुल्क वेगवेगळे असू शकते.

३) अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयातील विनाअनुदानित तुकडींसाठी उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावरून शुल्क आकारले जाते त्यामुळे एकाच विद्यालयात अनुदानित विनाअनाने तुकड्यांसाठी वेगवेगळे शुल्क असू शकते.

४) द्विलक्षी व माहिती तंत्रज्ञान या अतिरिक्त विषयांचे शुल्क वेगळे असेल.

५) शुल्काबाबत अधिक तपशील संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात संपर्क साधून मिळवता येईल.


Previous article
Next article
RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. according to gr it says that hsvc admission is to be done offline, it will be better if the process is explained on your level. candidates filling form online and if no choice to select hsvc subject what should be the process. can a candidate change the faculty to hsvc.pl clarify.

  2. according to gr it says that hsbc admio is to be done offline,it will be better if the process is expected on your level. candidates filling form online and if no choice to select hsbc subject what should be the process. can a candidate change the faculty to hsvc. Pl clarify.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

You cannot copy content of this page