Std 11 Admission Step by Step Process

Std 11 Admission

Std 11 Admission 2025

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी स्पेशल राऊंड 8 (कॅप राऊंड – 12) सुरू.

ज्या विद्यार्थ्यांना अजून अकरावी ला कुठेही प्रवेश मिळालेला नाही असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून प्रवेश घेऊ शकतात.

Latest Update-

Admission confirmation – 13 Oct 2025 to 14 Oct 2025

See the official letter-



Student Login and New Registration-

Official Website-

Login and Student Registration


Read More-

Digi Locker

Download 7/12 Utara

Useful Websites

Best AI Tools

Useful Android Apps

Spelling Activities for Kids

Windows Short cuts

Important G.R.

Monthly Attendance Sheet

Parts of Speech

CCRT Training

Video Editing


अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी स्पेशल राऊंड 7 (कॅप राऊंड – 11) सुरू झाला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना अजून अकरावी ला कुठेही प्रवेश मिळालेला नाही असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून प्रवेश घेऊ शकतात.

Latest Update-

Admission confirmation – 7 Oct 2025 to 8 Oct 2025

See official letter-


इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रकिया सन 2025-2026

अंतिम विशेष फेरी वेळापत्रक

CAP प्रवेश कार्यवाही सर्वसाधारण बाबीकालावधी
प्रवेशासाठी नवीन विद्याची नोंदणी तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण (एटीकेटी) विद्यार्थ्यासाठी नविन नोंदणी व भाग 1 मध्ये दुरुस्ती करणे.

विद्यार्थी अर्ज भाग 2 भरणे, त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान 1 ते कमाल 10 उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात.
4 ऑक्टोबर, 2025 रोजी सकाळी 10 वा. पासून ते 6 ऑक्टोबर, 2025 दुपारी 3 वा. पर्यंत
विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे.याबाबतचे वेळापत्रक दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वा. घोषित करण्यात येईल

See the official letter-


१) दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. पासून ते ०६ ऑक्टोबर २०२५ दुपारी ०३.०० वा. पर्यंत विद्यार्थी नविन नोंदणी, प्राधान्यक्रम भरणे, प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे.

२) या फेरीमध्ये अर्ज भरताना विकल्प भरण्याची व नोंदणीची सुविधा अंतिमतः देण्यात येणार आहे.

३) ज्या विद्यार्थ्यांनी या फेरीमध्ये विकल्प भरले आहेत त्यांच्या प्राधान्यक्रम / विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास केवळ अशा विद्यार्थ्यांना पुनश्चः रिक्त जागा दर्शवून रिक्त असलेल्या जागा विचारात घेवून विकल्पात बदल करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणनुक्रमे देण्यात येईल.

४) ज्या विद्यार्थ्यांनी विकल्प नोंदविला नाही त्यांना त्यास्तरावर गुणानुक्रमे महाविद्यालयाची अलॉटमेंट करण्यात येणार नाही. तद्नंतरही गुणानुक्रमे कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना पुनःश्च विकल्प नोंदविण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणनुक्रमे देण्यात येईल.

५) अशा उपरोक्त ०३ व ०४ मधील पध्दतीने कनिष्ठ महाविद्यालय अलॉट न होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक अलॉटमेंट नंतर विकल्प बदलण्याची सुविधा शेवटच्या विद्यार्थ्यांस महाविद्यालय अलॉटमेंट होईपर्यंत देण्यात येणार आहे.

६) ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंटच्या टप्प्यावर महाविद्यालयाची अलॉटमेंट झाल्यास त्यांना पुनःश्च विकल्प भरता येणार नाही

७) तसेच विकल्प बदलावयाची वेळी एसएमएस/संकेतस्थळावर देण्यात येईल

८) प्रत्येक स्तरावर विकल्प न बदलल्यास आपणांस प्रवेश घ्यावयाचा नाही असे समजून आपणांस प्रवेश प्रक्रियेतील त्या टप्प्यावर विद्यार्थ्याचा विचार प्रवेशाकरीता केला जाणार नाही.

९) उपरोक्त मुद्दा क्रमांक ०३, ०४ व ०५ मधील टप्पे पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळी गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची अलॉटमेंट करण्यात येणार आहे.

१०) तद्नंतर प्रत्यक्षात कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याचे वेळापत्रक दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ नंतर देण्यात येईल. त्या दरम्यान प्रवेश करणे आवश्यक असेल.



CAP Round – 10 (Special Round 6)

CAP प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबीकालावधी
प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग- 1 मध्ये दुरुस्ती करणे. विद्यार्थी अर्ज भाग-2 भरणे, त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत 10 पैकी 5 किमान उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करणे अनिवार्य असेल.22 सप्टेंबर, 2025 रोजी सांयकाळी 5 वाजेपासून ते 23 सप्टेंबर 2025 रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत.

विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे.
24 सप्टेंबर, 2025 सकाळी 10 वाजेपासून ते 25 सप्टेंबर, 2025 सांयकाळी 6 वाजेपर्यंत

See official letter-



Student Login and New Registration-

Official Website-

Login and Student Registration


Read More-

Important G. R.

Std 11 Form Filling

Std 11 online Admission Process

Good Thoughts

Vocabulary – Classical Words

Workload for Jr. College

Monthly Attendance Sheet

Demo Time Table for Jr. College


CAP Round – 9 (Special Round 5)

विशेष फेरी वेळापत्रक

CAP प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबीकालावधी
1) नविन कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी करणे.

2) कोटा जागा प्रत्यार्पित करणे. (ही अंतिम संधी असून पानंतर ही सुविधा देण्यात येणार नाही.)
11 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 08 ते दुपारी 01 पर्यंत

1) कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश क्षमता वाढविणे (ही अंतिम संधी असून यानंतर ही सुविधा देण्यात येणार नाही.)
11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 ते सायंकाळी 05 पर्यंत
प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी,
(एटीकेटी) विद्यार्थ्यांसाठी नविन नोंदणी व भाग – 1 मध्ये दुरुस्ती करणे.
विद्यार्थी अर्ज भाग – 2 भरणे
11 सप्टेंबर, 2025 रोजी सायंकाळी 08 ते 12 सप्टेंबर, 2025 सकाळी 09 पर्यंत

विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे.
12 सप्टेंबर, 2025 रोजी दुपारी 02 पर्यंत ते 13 सप्टेंबर, 2025 सांयकाळी 06

See the official letter


CAP Round – 8 (Special Round 4)

इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रकिया सन २०२५-२६

विशेष फेरी – ४

CAP प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबीकालावधीQuota प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबी
१. नविन कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी करणे. २. कोटा जागा प्रत्यार्पित करणे.०३ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सांयकाळी ६.००कनिष्ठ महाविद्यालयांनी कोटा (अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन कोटा) जागा प्रत्यार्पित करणे. (स्वेच्छेने)
प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण (एटीकेटी) विद्यार्थ्यासाठी व भाग- १ मध्ये दुरुस्ती करणे, तसेच प्रवेश रद करणे.०३ सप्टेंबर, २०२५, रोजी सकाळी १०.०० ते ०५ सप्टेंबर, २०२५ सायंकाळी ६.००प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग- १ मध्ये दुरुस्ती करणे. तसेच प्रवेश रद्द करणे.
रिक्त जागा प्रदर्शित करणे. (Vacancy)०५ सप्टेंबर, २०२५ दुपारी ४.०० वाजता.रिक्त जागा प्रदर्शित करणे. (Vacancy)
विद्यार्थी अर्ज भाग-२ भरणे०६ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १०.०० ते ०७ सप्टेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ६.००विद्यार्थ्यांनी अर्ज भाग २ भरणे, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन कोटा प्रवेशासाठी पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे व लॉक करणे.
विशेष फेरीसाठी Allotment पोर्टलवर जाहीर करणे.०८ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी १.०० वा.विद्यालयांनी प्रवेशासाठी कोटा गुणवत्ता यादी/निवड यादी दर्शनी भागात प्रसिध्द करणे.
विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे.०८ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी ०२.०० वा. ०९ सप्टेंबर, २०२५ रोजीविद्यालयांनी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे. (विद्यालयांनी कोटांतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची निवड झालेबाबत व या कालावधीत प्रवेशास येणेबाबत कळवावे.) विद्यार्थ्यांनी कोटांतर्गत प्रवेश निश्चित करणे.

See the official letter-


Round – 8

Available Process-

1) Registration for new students and ATKT students

2) Change in Part 1 in the form, if necessary.

3) Fill Part 2- (change stream, choose college, lock the form.)

1) नवीन विद्यार्थी आणि एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी नोंदणी

2) आवश्यकतेनुसार फॉर्ममधील भाग १ बदल करणे.  

3) फॉर्ममधील भाग २ भरणे. आवश्यकतेनुसार शाखा बदल करणे, कॉलेज निवडणे, फॉर्म लॉक करणे.



Student Login and New Registration-

Official Website-

Login and Student Registration


Past Event- This round is now closed.

CAP Round – 7 (Special Round 3)

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी राऊंड सुरू होत आहे.

This is the seventh round for Std. XI online admission.

Registration and change in Part 1 and Part 2 – 26 August to 27 August


Seventh round open to all – 26 and 27 August-

All these processes are available from 26/08/2025 08:00 AM till 27/08/2025 06:30 PM.

ही सर्व कामे २६/०८/२०२५ सकाळी ०८:०० ते २७/०८/२०२५ संध्याकाळी ०६:३० पर्यंत उपलब्ध आहेत.


Important Dates-

Allotment of students at college login and student login – 29 August

Admission of students at college – 29 August to 30 August


See official letter


Student Login and New Registration-

Official Website-

Login and Student Registration



Past events-

CAP Round – 6 (Special Round 2)

ज्या विद्यार्थ्यांना अजून एकही कॉलेज मध्ये अकरावी ला प्रवेश मिळाला नाही किंवा सायन्स/ कॉमर्स शाखा मिळाली नाही असे विद्यार्थी स्ट्रीम आर्ट्स करून अकरावी ला प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Students who have not yet been admitted to any college for class 11th or have not been offered a science/commerce stream can register for class 11th admission by pursuing the arts stream.

Dates- 15 August to 22 August (Extended Date)


See official letter –


Schedule-

दिनांक १५ ऑगस्ट २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ “विशेष फेरी”

या फेरी अंतर्गत कर्ता येणारी कामे-

1) विद्यार्थ्यांनी  नवीन नोंदणी करणे.

2) अगोदर भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करणे.

3) राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण (ATKT) विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्ज भाग-२ मध्ये प्राधान्यक्रम नोंदविणे – दि. 15 ऑगस्ट ते दि. 17 ऑगस्ट

“विशेष फेरी” या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अलॉटमेंट खालील तारखेला जाहीर केले जाईल.

दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता.

प्रत्यक्ष प्रवेश-

दिनांक १९ ऑगस्ट २०२५ ते दिनांक २० ऑगस्ट, २०२५

” विशेष फेरी” या फेरीमध्ये अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.०० वाजलेपासून ते दिनांक २० ऑगस्ट, २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत हा कालावधी अलॉटमेंट झालेल्या संबंधित उच्य माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून विद्यार्थ्याला आपला प्रवेश निश्चित करता येईल.


See Time Table-


See the official Letter-


Past Event-

CAP Round – 5

Allotted students list for the fifth round (Special Round – 1) is now closed.

विशेष फेरी एक म्हणजेच कॅप राऊंड पाच साठी कॉलेजला मिळालेले विद्यार्थी कॉलेज लॉगिन वर दिसत आहेत. ओपन टू ऑल राऊंड एक चे विद्यार्थी कॉलेजला उपलब्ध झालेले आहेत.

See Report Tab and download the list.

रिपोर्ट टॅब पहा आणि यादी डाउनलोड करा.

Schedule for the Fifth Round- Special Round- 1

पाचव्या राऊंड चे वेळापत्रक पहा.

See the official letter


Login Link for College (Click Here)


Important Alert-

ओपन टू ऑल या फेरीमध्ये प्रवेशाकरिता अर्ज करण्यासाठी वेळापत्रक

ओपन टू ऑल फेरीदिनांक 4 ऑगस्ट 2025 सकाळी 8:00 वाजता पासून ते दिनांक 5 ऑगस्ट 2025 सायंकाळी 6:30प्राधान्यक्रम व अर्जाचा भाग एक मध्ये दुरुस्ती करण्यासाठी तसेच नव्याने नोंदणी करावयाच्या विद्यार्थ्यांकरिता

पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रवेश फेरीमध्ये त्यांची नोंदणी करू शकतात व इयत्ता अकरावीच्या प्रवेश करिता प्राधान्यक्रम नोंदवू शकतात. आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या प्रवेश फेरीमध्ये त्यांच्या अर्जाचा भाग एक व भाग दोन यामध्ये त्यांच्या आवश्यकतेनुसार बदल व दुरुस्ती करू शकतात.

ओपन टू ऑल या फेरीअंतर्गत पुढील बाबी विद्यार्थ्यांना करता येतील-

1) माहे जुलै 2025 च्या राज्यमंडळ संलग्नित मंडळाचे पुरवणी परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या वि‌द्यार्थ्यांना अर्ज भरता येतील.

2) यापूर्वी अपूर्ण अर्जाचा भाग एक व दोन असल्यास अशा विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज पूर्ण भरता येईल.

3) ओपन टू ऑल या फेरीमध्ये अर्जाच्या भाग व एक-दोन मध्ये आवश्यकतेनुसार बदल करता येईल व प्राधान्यक्रम मध्ये सुद्धा बदल करता येईल.

4) अद्याप पर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या फेरीदरम्यान नव्याने नोंदणी व प्राधान्यक्रम देता येतील.

5) यापूर्वी भरलेल्या अर्जाच्या भाग व एक-दोन मध्ये आवश्यकतेनुसार बदल किंवा दुरुस्ती विद्यार्थ्यांना करता येईल


See official letter-


Official Website-

https://mahafyjcadmissions.in


Read More-

Important G. R.

Std 11 Form Filling

Std 11 online Admission Process

Good Thoughts


Closed events-

For fourth Round-

Students can check their allotted college in their login. Check if they get college for Std. 11 admission or not.

Admission schedule

From 31 July 2025 to 2 August 2025

३१ जुलै, २०२५ सकाळी ११.०० वा. पासून ते ०२ ऑगस्ट, २०२५ सायंकाळी ६.०० वा. पर्यंत.


See official letter-


Past Event-

CAP Round – 4

Students can fill options and lock their preferences for round 4 from 28th July 00.00 hrs. onwards to 29th July 2025 6.30 pm

विद्यार्थी २८ जुलै २०२५ रोजी सकाळी ००.०० वाजल्यापासून ते २९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत चौथ्या फेरीसाठी त्यांचे पर्याय भरू शकतात आणि फॉर्म लॉक करू शकतात.

दिनांक 28 जुलै 2025 पासून अर्जाचा भाग दोन/कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरण्यास सुरु होत आहे. त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणेः

नियमित फेरी – चारचे वेळापत्रक

अ.क्रकालावधीनियमित फेरी 4 मधील कॅप व कोटाअंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी कार्यवाही
1)28 जुलै 2025 सकाळी 10.00 वा ते 29 जुलै 2025 सायंकाळी 6.30 वा.नविन नोंदणी, पहिल्या फेरी दरम्यान भरलेल्या भाग-1 मध्ये दुरुस्ती करणे तसेच अद्यावत माहिती भरणे, अर्ज-भाग-1 व 2 भरणे, कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे. (कॅप व कोटा प्रवेश) अर्ज 1 व 2 लॉक करणे.
2)31 जुलै, 2025 ते 02 ऑगस्ट, 2025विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे. (कॅप व कोटा प्रवेश)

Login Link for Students-

Login (Click Here)


Important-

राज्यातील इयत्ता ११ वी चे वर्ग सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या/उच्च माध्यमिक शाळा हया शासन निर्णय दिनांक ०६/०५/२०२५ अन्वये दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ पूर्वी सुरु करणे आवश्यक आहे.

As per the government resolution dated 06/05/2025, class 11th of all junior colleges/higher secondary schools in the state must start before August 11, 2025.


CAP Round – 3

Revised Time Table

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक बदललेले आहे विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश घेण्याची तारीख बदललेली आहे ती खालील प्रमाणे आहे.

The schedule for the third round of the 11th online admission process has been changed. The date on which students will go to the college to take their admission has been changed and is as follows:

CAP प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबीकालावधी
नियमित फेरी-३ साठी Allotment पोर्टलवर जाहीर करणे.

Student & College लॉगीनमध्ये तपशील दर्शविणे.

विद्यार्थ्यांना SMS व्दारे संदेश पाठविणे.

Display of cut-off list for the Admission Round.

विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे,

Proceed for Admission by students

Admit/Reject/Cancel by Jr. College

(विद्यालयांनी आपल्या विद्यालयात प्रवेशासाठी Allot झालेल्या विद्याध्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करुन विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत. विनंतीनुसार झालेले प्रवेश रद्द करता येतील.)
25 जुलै, 2025 सकाळी 10 वा. पासून ते 26 जुलै, 2025 सायंकाळी 5.30 वा. पर्यंत.  
रिक्त जागा प्रदर्शित करणे. (Vacancy)27 जुलै, 2025 सायंकाळी 6 वा.

See the official letter-


Stopped Event-

Student Registration for new students is now paused. Those students who didn’t register for Std. 11 online admission process can register through Registration Link in the next round.

नवीन विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी नोंदणी सध्या उपलब्ध नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ११ वी च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली नव्हती ते आता नोंदणी लिंकद्वारे पुढील फेरीत नोंदणी करू शकतात.

👇

Registration Link (Click Here)


Cap Round – 2

इ.११ वी ऑनलाईन प्रवेशाची दुसऱ्या राऊंडची विद्यार्थी वाटप यादी कॉलेज लॉगिनला उपलब्ध झाली आहे.

The second-round student allotment list for Class 11 online admission has been made available on College Login.

17 जुलै 2025  नियमित फेरी-२ साठी Allotment पोर्टलवर जाहीर करणे. Student & College लॉगीनमध्ये तपशील दर्शविणे. विद्याथ्यांना SMS व्दारे संदेश पाठविणे.
 
18 जुलै 2025 ते 21 जुलै 2025  विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे.

23 जुलै 2025रिक्त जागा प्रदर्शित करणे. (Vacancy)

For Students-

Check SMS in your mobile phone. If you are allotted any college, you will get text message about it. You can also check your allotment status in student login. Click below.

तुमच्या मोबाईल फोनमध्ये एसएमएस तपासा. जर तुम्हाला कोणतेही कॉलेज मिळाले असेल तर तुम्हाला त्याबद्दलचा मजकूर संदेश मिळेल. तुम्ही विद्यार्थी लॉगिनमध्ये तुमची कॉलेज वाटपाची स्थिती देखील तपासू शकता.


Official Website-

https://mahafyjcadmissions.in


Past Events-

CAP-Round-2 for Std 11 Admission 2025 is going to start from 10th July 2025 at 10:00 AM to 13th July 2025 at 6:30 PM.

वेळापत्रक

प्रकारपासूनपर्यंत
प्रवेश फेरी क्रमांक 2दिनांक 10 जुलै 2025 सकाळी 10 वा.दिनांक 13 जुलै 2025 सायंकाळी 6:30 वा. पर्यंत आहे.

Process-

1) For new Registered Students –

नवीन नोंदणीकृत विद्यार्थ्यांसाठी

Make changes in Part 1 if essential.

Lock Part 1

Open Part 2

Choose Stream

Choose College

Lock Preference


2) For the registered students who don’t get admission in the first round –

पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांसाठी

Open Part 2

Choose Stream

Choose College

Lock Preference


नियमित फेरी २ साठी वेळापत्रक

CAP Round 2 – Time Table

10 जुलै 2025 (सकाळी 10 वा.) ते 13 जुलै 2025 (सायंकाळी 6.30 वा.)प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग- १ मध्ये दुरुस्ती करणे व अर्ज 2 भरणे व लॉक करणे. तसेच पहिल्या यादीत नंबर न लागलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज 2 मध्ये कनिष्ठ महाविद्यालय प्राधान्यक्रम देणे व लॉक करणे.
17 जुलै 2025  नियमित फेरी-२ साठी Allotment पोर्टलवर जाहीर करणे. Student & College लॉगीनमध्ये तपशील दर्शविणे. विद्याथ्यांना SMS व्दारे संदेश पाठविणे.
 
18 जुलै 2025 ते 21 जुलै 2025  विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे.
23 जुलै 2025रिक्त जागा प्रदर्शित करणे. (Vacancy)  

See the official letter-


Quota Surrender-

इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ नियमित फेरी एक संपल्यानंतर सर्व अल्पसंख्यांक तसेच बिगर अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयांनी कोटामधील रिक्त जागा प्रत्यार्पित करावयाच्या कार्यवाहीबाबत.

See the letter-


Official Website-

https://mahafyjcadmissions.in


Read More-

Important G. R.

Std 11 Form Filling

Std 11 online Admission Process


Past Events-

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग-१ भरणे, नियमित फेरी १ मध्ये नोंदणी अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा भाग-१ भरण्याची सुविधा संकेतस्थळावर दिनांक ०२ जुलै, २०२५ पासून सकाळी १०.०० ते दिनांक ०७ जुलै, २०२५ ला सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कालावधी देण्यात येत आहे.

नियमित फेरी-२ मधील अर्जाचा भाग-२ पसंतीक्रम देण्याची सुविधा दिनांक १० जुलै, २०२५ ते दिनांक १३ जुलै, २०२५ पर्यंत कालावधी देण्यात येणार आहे. याचा वापर खाली दिलेल्या विद्यार्थ्यांनी करायचा आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे मात्र मेरीट लिस्ट मध्ये पहिल्या राऊंड ला नंबर लागलेला नाही अशांना पार्ट 2 अनलॉक करून पुन्हा कॉलेज व स्ट्रीम (शाखा) निवडून पार्ट 2 लॉक करावा लागणार आहे. त्या नंतर असे विद्यार्थी दुसऱ्या राऊंड ला मेरीट नुसार पात्र होऊ शकतील.

ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करावयाची आहे. त्यांच्याकरीता संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर दिनांक ०२ जुलै, २०२५ पासून सकाळी १०.०० ते दिनांक ०७ जुलै २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कालावधी देण्यात येत आहे.

1) New student registration and filling of Part-1 of the application form, facility to fill Part-1 of the application form for students whose registration is incomplete in regular round 1
From 10:00 AM on July 2, 2025 to 5:00 PM on July 7, 2025.
2) Facility to give preference to Part-2 of the application in Regular Round-2
From July 10, 2025 to July 13, 2025.
3) Registration by college
From 10:00 AM on July 2, 2025 to 5:00 PM on July 7, 2025.

See official Letter-


Revised Schedule for CAP Round – 1

Important News –

प्रवेश फेरी क्रमांक १ ची यादी व विविध कोटा प्रवेशाची यादी दि. 28.06.2025 रोजी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी दि. 30.06.2025 ते दि. 07.07.2025 संध्याकाळी 6.00 या कालावधीत आपल्या लॉगिन मधून Proceed for Admission यावर क्लिक करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा.


College can see allotted students number in college login.

कॉलेज लॉगिनमध्ये कॉलेजला मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता येईल.

कॅप राउंड १ साठी नवीन वेळापत्रक-


Important Dates- महत्वाच्या तारखा-

Event       Date
CAP Round 1 Allotment of College    28.06.2025
Process for Admission by Students  30.07.2025 to 07.07.2025
Display of Vacancy by colleges   09.07.2025

See official Letter-


दिनांक-30/06/2025 CAP Round – 1 सुरु होत आहे. या साठी महत्वाच्या सूचना-

१) अल्पसंख्यांक कॉलेज च्या सीट मॅट्रिक मध्ये बदल झाला असल्याने त्यांच्याकडे नव्याने उपलब्ध रिक्त कोटा जागांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी लॉगिन मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

२) विद्यार्थ्यांचे नाव एकाच वेळी ४ ठिकाणी सुद्धा येऊ शकते. म्हणजेच विद्यार्थ्यांचे नाव अल्पसंख्यांक, इनहाऊस व व्यवस्थापन कोटा तसेच कॅप अशा चारही जागी दिसू शकते. पैकी कोणत्या यादीतील प्रवेश निश्चित करावा हे सर्वस्वी विद्यार्थी आणि सबंधित कॉलेज वर अवलंबून आहे.

३) एखाद्या अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयास 60 प्रवेश क्षमता असेल व तिथे तीनही कोटा लागू असल्यास 39 जागा वगळून उर्वरित 21 कॅप जागेसाठी जेवढे अर्ज अर्ज आले असतील पैकी गुणवत्ता निहाय फक्त जनरल संवर्गातून प्रवेश दिले जातात. (विद्यार्थ्यांची मूळ कॅटेगरी कोणतीही असली तरी अलॉटमेंट जनरल मधून दिले जाते)

४) ज्या विद्यार्थ्यांची अद्यापही नोंदणी झालेली नाही ते विद्यार्थी 30 जून पासून प्रवेश अर्जाचा भाग 1 पूर्ण करून लॉक करू शकतात. तसेच ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली मात्र भाग 1 अपूर्ण राहिला असेल ते सुद्धा आपला भाग 1 पूर्ण करून लॉक करू शकतात.

५) दुसर्या फेरीसाठी कॅप व कोटा चे भाग 2 (ऑप्शन फॉर्म) भरण्याची सुविधा 9 जुलै नंतर स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करून देण्यात येईल.

६) रिक्त कोटा जागांपैकी जेवढ्या जागा दुसऱ्या कॅप फेरीसाठी प्रत्यर्पित करायच्या असतील त्या 30 जून ते 7 जुलै च्या दरम्यान करता येतील. करायलाच हव्यात असे बंधन नसून ऐच्छिक आहे.

७) पहिल्या कॅप फेरीत पाहिल्याच पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाले असतांना कोणत्याही कारणास्तव प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी “ओपन फॉर ऑल” राऊंड पर्यन्त बाद करण्यात येईल.

८) पहिल्या कॅप फेरीत निश्चित केलेला प्रवेश कोणत्याही कारणास्तव रद्द केल्यास विद्यार्थी “ओपन फॉर ऑल राऊंड पर्यन्त बाद करण्यात येईल.

९) कोटा प्रवेशास वरील दोनही नियम लागू होत नाहीत. कोट्यातुन घेतलेला प्रवेश रद्द केला तरी पुढच्या फेरीत सहभागी होता येईल.

१०) एखाद्या विद्यार्थ्याने कॅप साठी एकच कॉलेज निवडले होते मात्र पहिल्या यादीत अलॉटमेंट मिळाले नसेल तर पुढील फेरीत अर्ज भरता येईल.

११) कॉलेज सीट मॅट्रिक मध्ये जनरल संवर्गाच्या जेवढ्या जागा असतात त्यावर अलॉटमेंट करतांना विद्यार्थ्यांच्या मूळ संवर्गाचा विचार केल्या जात नाही. विद्यार्थ्यांचा मूळ संवर्ग एसटी किवा ओबीसी किंवा इतर कुठलाही असला तरी जर एखाद्या कॉलेज करीता आलेल्या अर्जात गुणवत्ता निहाय तो विद्यार्थी जनरल संवर्गाच्या जागेच्या संख्येत बसत असेल तर त्याची अलोटेड कॅटेगरी जनरल प्युयर किंवा जनरल विमेन अशी असू शकते. त्याबाबतीत कुठलीही त्रुटी यादीत नाही.

१२) जर विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट आरक्षणाच्या संवर्गातून झाले असल्यास त्याचे किंवा त्याच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.

१३) एससी, एसटी, EWS वगळून इतर संवर्गाला नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र लागू आहे. अपरिहार्य कारणास्तव ते प्रमाणपत्र किंवा त्याची पावती विद्यार्थ्याकडे नसल्यास कॉलेज स्तरावर त्यासबंधित निर्णय घेऊन हमीपत्र भरून घ्यावे.

१४) कॉलेज लॉगिन मधून प्रवेश निश्चित करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे अॅडमिशन लेटर प्रिंट करून प्रवेश अर्जाला जोडून ठेवणे आवश्यक आहे. अलॉटमेंट लेटर प्रिंट करून ठेवणे अनिवार्य नाही.

१५) नियमीत फेर्यांमध्ये सर्व अलॉटमेंट हे संवर्गनिहाय होतात. एखाद्या संवर्गाचे किंवा संवर्गातील समांतर आरक्षणाचे विद्यार्थी नसल्यास त्या जागा “ओपन फॉर ऑल” राऊंड मध्ये इतर संवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ट्रान्सफर केल्या जातात.

१६) प्रत्येक फेरीत सहभागी होण्यासाठी वेळापत्रकानुसार प्रवेश अर्जाचा भाग-२ लॉक करणे अनिवार्य आहे. प्रत्येक फेरीत विद्यार्थी पसंतिक्रम बदल करू शकतात.

१७) कॉलेजने 50 अर्ज भरले परंतु कॅप च्या यादीत 35 च आले. असे घडले असेल तर कॉलेज चे सीट मॅट्रिक आणि अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे जात संवर्ग यांची संख्या पडताळून बघावी. एखाद्या संवर्गाचे अर्ज सीट मॅट्रिक पेक्षा जास्त असल्यास त्यामधून गुणवत्तेनुसार अलॉटमेंट दिले जाते.

१८) एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट का झाले नाही हे विद्यार्थी लॉगिन मध्ये कॅप अॅडमिशन मेन्यू मध्ये कॅप अलॉटमेंट मध्ये जाऊन ‘रीजन फॉर नॉट अलॉटमेंट’ वर क्लिक करून तपासू शकता.

१९) एखादा विद्यार्थी समांतर आरक्षणातून प्रवेश घेत असल्यास त्यासबंधीचे सक्षम अधिकाऱ्या ने दिलेले सर्व प्रमाणपत्र तपासून बघणे अनिवार्य आहे.

२०) शक्यतो जोवर विद्यार्थी / पालक मूळ कागदपत्र प्रत्यक्ष कॉलेज मध्ये सादर करत नाहीत तोवर ऑनलाइन प्रवेश निश्चित करू नये.

२१) महाविद्यालयाचे शुल्क कॉलेज त्यांच्याकडे उपलब्ध सुविधेनुसार ऑनलाईन/ऑफलाईन स्वीकारू शकतात.

२२) कॉलेज लॉगिन मधून डाउनलोड होणार्याा एक्सेल फाइल मध्ये दिलेली प्रवेश यादी अल्फाबेट नुसार दिलेली असू शकते. फिल्टर लाऊन ती यादी मेरीट नुसार सेट करून घ्यावी. मेरीट नुसार सेट केली की अलॉटमेंट बाबतीतल्या सर्व शंका दूर करण्यात मदत होईल.

२३) कोटा प्रवेशासाठी या फेरीमध्ये सुद्धा ओटीपी राहील. कॅप प्रवेशासाठी ओटीपी ची आवश्यकता नाही. कॅप चा प्रवेश रिजेक्ट किंवा कॅन्सल करण्यासाठी ओटीपी अनिवार्य असेल.

२४) विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये त्रुटी असल्यास ग्रुप वर विद्यार्थ्याचा आयडी नाव व नवीन मोबाईल नंबर पाठवावे, बदलून देण्यात येईल.

२५) कोटा सीट सरेंडर करतांना प्राचार्यांना ओटीपी जातो. या जागा विचारपूर्वक सरेंडर कराव्यात. एकदा सरेंडर केलेल्या जागा परत मिळणार नाहीत.

२६) बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ काही कारणास्तव अनलॉक केल्यावर लॉक करायचा राहून गेला. त्यामुळे गुणवत्ता यादीत त्यांना कॉलेज मिळालेले नाही. काहींनी प्रिंट काढल्यानंतर ऑप्शन मध्ये बदल केलेत. त्यामुळे जेव्हा विद्यार्थी / पालक आपल्याकडे येऊन सांगतात की नंबर लागला नाही तेव्हा प्रिंट ऐवजी प्रत्यक्ष त्याचे लॉगिन करून वस्तुस्थिती तपासून बघावी व त्यांचे शंका निरसन करावे.

२७) ऑनलाइन यादीतील नावाचे स्पेलिंग व टीसी/गुणपत्रिका यावरील स्पेलिंग यात तफावत असल्यास योग्य ती पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा.

२८) बायफोकल चे प्रवेश हे महाविद्यालय स्तरावर करायचे आहेत. कैंप च्या यादीतून आलेले विद्यार्थी हे जनरल सायन्स मध्ये प्रवेशीत असतील. त्यानंतर त्यातील इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज घेऊन आरक्षण व गुणवत्ता निहाय पुढील प्रक्रिया वेळोवेळी देण्यात येणाऱ्या वेळापत्रकानुसार करावी.

२९) एखाद्या कॉलेज ची प्रवेश क्षमता 60 असेल व तिथे बायफोकल कोर्स सुद्धा असेल तर जनरल व बायफोकल असे दोन्ही मिळून 60 च प्रवेश होतील. 60 व्यतिरिक्त बायफोकल चे प्रवेश होणार नाहीत.


अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसाठी सूचना-

1) विद्यार्थ्यांचे लॉगिनमध्ये नव्याने आलेले TAB खालीलप्रमाणे असतील-

Allotment list

Vacancies

Cut-off list

2) विद्यार्थ्यांचे लॉगिनमध्ये नवीन बटन्स समाविष्ट केले आहेत, ते खालील प्रमाणे-

CAP Admission,

Upload Documents,

Timeline Login

3) विद्यार्थ्याला पूर्वी दिलेल्या पसंती क्रमानुसार कॉलेजची यादी दिसेल. त्यापैकी एका कॉलेजला प्रवेश निश्चीत झाल्याचे दिसून येईल.

त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने प्रत्यक्ष उपस्थित राहून विहित वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

तसेच इतर कॉलेज का वगळण्यात आले याची माहिती विद्यार्थी लॉगिनमध्ये दिसून येईल.

4) प्रथम फेरीसाठी मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी इच्छुक नसेल तर, त्याला संबंधित कॉलेजमध्ये जाऊन लेखी नकार कळवावा लागेल.

त्यानुसार संबंधित कॉलेज विद्यार्थ्याला दुस-या फेरीसाठी प्रवेशास पात्र करतील. परंतु प्रथम फेरीमध्ये प्रथम पसंतीचे कॉलेज मिळाले असल्यास शेवटच्या फेरीसाठीच विद्यार्थी प्रवेश पात्र ठरेल.

5) कोटा फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही त्यांनी पहिल्या फेरीच्या पूर्वीच पार्ट 2 लॉक करुन कोटा प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी पात्र होऊन कोटा प्रवेश संबंधित कॉलेजमध्ये निश्चीत करुन घ्यावा. यासाठी दिनांक-23 व 24 जून ही तारीख पार्ट 2 लॉक करण्यासाठी निश्चीत तारखा आहेत.

कोटा प्रवेश घ्यावयाचा नसल्यास पार्ट 2 लॉक करण्याची गरज नाही. असा विद्यार्थी आपोआप CAP फेरीसाठी पात्र होतील.


अकरावी प्रवेशासाठी कॉलेजसाठी सूचना-

1) कॉलेज लॉगिनला नव्याने आलेले TAB-

कॉलेजचे आतापर्यंतचे स्टेटस

कोटा अॅडमिशन मध्ये झालेले प्रवेश

CAP Admissions List

2) कॉलेजने करावयाची कार्यवाही- विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेशास आल्यास सर्वप्रथम त्याला Concent (संमती) देणे गरजेचे आहे.

3) प्रवेशावेळी विद्यार्थ्यांचे सर्व कागदपत्रे अपलोड केले बाबत खात्री करावी. अपलोड केले नसल्यास प्रथम सर्व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सांगावे. त्यानंतरच प्रवेशाची प्रक्रिया सूरू करावी.

4) CAP Admissions- कॅप अॅडमिशन सुरु झाल्यावर कॉलेज लॉगिन ला नव्याने तीन टॅब उपलब्ध होणार आहेत-

1) Confirm Admission-

यामध्ये शाखानिहाय विद्यार्थ्यांची यादी दिसेल. प्रत्येक कॉलेजने विद्यार्थ्यांना ऑनलाईन सिस्टिमवर प्रवेश देणे गरजेचे आहे. त्याशिवाय प्रवेश अंतिम होणार नाहीत.

पहिली फेरी दिनांक- 26 जून पासून सुरू होत असून असून 3 जूलै अंतिम तारीख आहे.

प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया 27 जून पासून सूरू होईल. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये उपस्थित राहून प्रवेश घेण्यासाठी दिनांक-03 जूलै 2025 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत असून कॉलेजने त्यांना ऑनलाईन प्रवेशित करण्यासाठी 03 जूलै 2025 पर्यंत रात्री 8.00 वाजेपर्यंत राहिल.

Confirm Admission करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. प्रामुख्याने Best Of 5 मधील गुण, जातीचा प्रवर्ग व इतर आरक्षणाबाबत खात्री करुन घ्यावी. त्यानंतरच प्रवेश अंतिम करावा.

कागदपत्रे अपूर्ण अपलोड केली असल्यास सर्व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कळवावे. सरळ विद्यार्थ्यांचा प्रवेश रदद करु नये.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी उपलब्ध नसल्यास सदर ऑनलाईन अर्ज रिजेक्ट करावा. अर्ज रिजेक्ट करण्यासाठी विद्यार्थी मोबाईलवर ओटीपी जाईल तो ओटीपी टाकून विद्यार्थ्यांचे समक्षच त्याचा प्रवेश रदद करावा.

त्याची प्रिंट काढून स्वाक्षरी करुन विद्यार्थ्यांना त्याची प्रत द्यावी. प्रवेश रिजेक्ट करण्याचे सबळ कारण ऑनलाईन टाकावे व विद्यार्थ्याला देखिल त्याची कल्पना द्यावी.

त्रुटीची पूर्तता झाल्यावर पुढील फेरीसाठी संबंधित विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असेल याची विद्यार्थ्याला देखिल त्याची कल्पना द्यावी.

2) Cancel Admission-

कोटा फेरीमध्ये घेतलेले प्रवेश व इतर फे-यांमध्ये घेण्यात येणारे प्रवेश जर एखाद्या विद्यार्थ्यांला रदद करावयाचे असल्यास त्यासाठी हा टॅब कॉलेज लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

यासाठी देखिल संबंधित विद्यार्थी समक्ष असणे गरजेचे असून त्याचेकडून प्रवेश रदद करण्याचे लेखी कारण लिहून घ्यावे. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी जाईल तो ओटीपी टाकून घेतलेला प्रवेश रदद करता येईल.

यासाठी विद्यार्थी समक्ष असणे गरजेचे आहे. प्रिंट काढून विद्यार्थ्यास सही करुन देण्यात यावी.

3) Print Letter-

यामध्ये कॉलेजला प्राप्त शाखानिहाय सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल. यामधील निळ्या रंगाच्या टॅबमधून प्रवेश पत्र (Admission Letter) प्रिंट काढून विद्यार्थ्यांस देता येईल.

DATA Clean-

राज्यमंडळाचे जे विद्यार्थी 175 पेक्षा कमी गुण मिळवले आहेत त्यांना प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतून बाद करण्यात आले आहे. ते पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर 175 पेक्षा अधिकचे गुण 05 विषयांत मिळाल्यास त्या टप्यावरील फेरीसाठी विद्यार्थी पात्र ठरतील याची कल्पना संबंधितांना द्यावी.

कॉलेजचे लॉगिन एक पेक्षा जास्त चालू ठेवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Procedure for Admissions-

ही लिंक संबंधित कॉलेजच्या लॉगिनवर नेहमी खूली असेल. यामध्ये कॉलेज प्रवेश प्रकियेची माहिती नेहमी अपडेट करु शकतात.


See Official Letter-


Official Website-

https://mahafyjcadmissions.in


अकरावी प्रवेशासाठी शाळांनी करावयाची सर्व साधारण कार्यवाही-

Steps to be taken by schools for admission to 11th standard-

1) कॉलेज लॉगिन वरून विद्यार्थ्यांची यादी शाखा निहाय पहावी.

The list of students should be viewed branch-wise from the college login.

2) विद्यार्थ्यांना संपर्क साधून त्यांचे ओरिजनल डॉक्युमेंट मागवावेत व ते तपासावेत.

Students should be contacted to bring their original documents for verification.

3) डॉक्युमेंट व माहिती योग्य असेल तर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी कार्यवाही करावी.

If the documents and information are correct, students should be admitted to Std.11.

4) विद्यार्थ्यांच्या मोबाईलला ओटीपी पाठवून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागेल.

Students will have to be admitted by sending an OTP to their mobile phones.

5) गुणवत्तेनुसार व इंटेक नुसार आवश्यक विद्यार्थी प्रवेश झाल्यानंतर ती शाखा बंद होईल.

After the required number of students is admitted as per merit and intake, that branch will be closed.

6) रिक्त असलेल्या जागा दुसऱ्या राउंडला भरता येतील. त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती द्यावी.

The vacant seats can be filled in the second round. Students should be informed about this.

7) ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी असेल त्यांना दुसऱ्या राउंडला रजिस्ट्रेशन करता येईल.

Students whose registration is pending can register in the second round.

8) विद्याथ्यांचे 50% प्रवेश झालेले असतील तर अकरावीचे वर्ग सुरू करता येतील.

If 50% of the students have been admitted, the eleventh standard classes can be started.


Past Events –

General merit list is now available. Students can check their details through ‘General Merit List ‘ tab.

सर्व साधारण गुणवत्ता यादी उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थी त्यांची माहिती जनरल मेरिट लिस्ट या टॅबवर जाऊन चेक करू शकतात.

Steps to check the Maharashtra FYJC 2025 Merit List-

Students who have applied for Std. 11 admissions can follow these steps to access the merit list:

Step 1. Go to the official website at – खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा.

https://mahafyjcadmissions.in/landing

Step 2. Look for the “FYJC 2025 General Final Merit List” option. जनरल मेरिट लिस्ट या टॅब वर क्लिक करा.

Step 3. Enter your application number and password. स्वतःचा एप्लीकेशन नंबर व पासवर्ड टाका

Step 4. Check your rank and save the the merit list for future reference. स्वतःची रँक तपासून घ्या व माहिती सेव्ह करून ठेवा.

Students will see following page. खाली दिलेल्या चित्राप्रमाणे पेज दिसेल.


इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात महत्वाचे मूद्दे-
Important points regarding the online admission process for class 11th –


माहिती भाग -1


1) ऑनलाईन वेळापत्रक संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एकच असेल.


The online timetable will be the same for the entire state of Maharashtra.

2) विदयार्थ्याला एकाच ठिकाणी सर्व कॉलेज व त्या कॉलेज मधील सर्व शाखांची माहिती मिळेल तसेच संबधित कॉलेजमध्ये उपलब्ध विषयांची माहिती मिळेल.


The student will get information about all the colleges and all the branches in that college at one place as well as information about the subjects available in the respective college.

3) विदयार्थ्याला फक्त एकच अर्ज ऑनलाईन भरावा लागेल. त्यात तो दहा कॉलेजचे नावे पसंतीक्रमानुसार प्रवेशासाठी टाकू शकतो. कमीत कमीत एक कॉलेज व जास्तीत जास्त दहा कॉलेज ची नावे टाकता येतील.


The student will have to fill only one application form online. In it, he can enter the names of ten colleges for admission in the order of preference. A minimum of one college and a maximum of ten colleges can be entered.

4) https://mahafyjcadmissions.in या संकेत स्थळावर विद्यार्थी स्वत:च्या मोबाईलवरुन अकरावी प्रवेशसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकेल. संगणकावर देखील अर्ज भरता येतील. मात्र सायबर कॅफेवरुन अर्ज भरु नयेत.


Students can fill the online applications for 11th admission using their mobile phones on the website https://mahafyjcadmissions.in.


Applications can also be filled on a computer. However, applications should not be filled from a cyber cafe.

5) विदयार्थ्यांना किंवा पालकांना अकरावी प्रवेशासंदर्भातील माहीतीपुस्तीका डाऊनलोड करता येईल. ती संपूर्ण वाचूनच अर्ज भरावा.


Students or parents can download the information booklet regarding 11th admission. They should read it completely before filling the application form.

6) विद्यार्थी वैयक्तीक माहिती- नाव, पत्ता तसेच मागील शाळेची माहिती, दहावीचे विषय त्यांचे माध्यम, जात-संवर्ग, क्रिडा स्पर्धा व दिव्यांग असेल तर ती माहिती भरावी.


Student’s Personal information- Name, address, previous school information, 10th standard subjects, medium, caste-category, sports competitions and disabled if any, should be filled in.

7) विदयार्थ्यांनी आपले आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत. ते व्हेरीफाईड करुनच कॉलेज विदर्यार्थ्यांचा प्रवेश निकषांच्या आधारे निश्चित करेल.


Students have to upload their required documents. Only after verifying the documents college will give the admission of the students based on the authorised criteria.

8) अर्जातील भाग एक परीपुर्ण भरुन लॉक / प्रमाणीत करण्यासाठी ‍निवडा. तेथे व्हेरीफिकेशन (प्रमाणीत) केले जाईल. भाग एक च्या डॅशबोर्डवर व्हेरीफाईड असणे आवश्यक आहे. असे नसल्यास असे अर्ज प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राहय धरले जाणार नाहीत.


Complete and lock/verify Part One of the application form. Self-verification will be done there. Part One must be verified on the dashboard, otherwise, such applications will not be considered for admission.

9)अर्जाची प्रिंट काढावी.


Print out the application form.

10) विदयार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर केल्याबाबतची पोच पावती म्हणून SMS मिळेल.


Students will receive an SMS as an acknowledgement of submission of online application.

11) सर्व विदयार्थ्यांना सर्व कॉलेजचा गुणांचा कट ऑफ पहाता येईल.


All students will be able to see the cut-off marks of all colleges.


माहिती भाग – 2


1) अकरावीला कोणत्याही प्रकारे ऑफलाईन प्रवेश होणार नाहीत. घेतल्यास कार्यवाही होईल. असे घेतलेले प्रवेश संचमान्यतेसाठी व बोर्ड फॉर्म भरणेसाठी पात्र राहणार नाही.


There will be no offline admissions for class 11th in any way. Action will be taken if taken. Admissions taken in this manner will not be eligible for admission and filling of board forms.

2) (MCVC) किमान कौशल्य (HSVC) विभागाचे प्रवेश ऑफलाईन होतील.


(MCVC) Minimum Skilled Vocational Certificate (HSVC) admissions will be offline.

3) https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर अकरावी प्रवेश फॉर्म भरता येईल.


The 11th admission form can be filled on the website https://mahafyjcadmissions.in.

4) विदयार्थ्याचा दहावीचा सीट नंबर व आईचे नाव टाकले कि व्हेरीफाय करा असे येईल. तेथे yes वर क्लिक करा. विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील माहिती आपाप येईल.


After entering the student’s 10th class seat number and mother’s name, it will ask you to verify. Click on yes there. The information related to the student’s board exam will appear automatically.

5) प्रवेश अर्जाचा पहीला भाग सेल्फ व्हेरीफाईड झाल्यावरच अर्जाच्या भाग दोन मधील पसंतीक्रम व इतर माहीती भरता येईल. यात बेस्टऑफ फाईव्ह चे विदयार्थ्याचे गुण व शेकडा गुण आपोआप दिसतील.


Only after the first part of the admission application is self – verified, the preference order and other information in part two of the application can be filled. The student’s best-of-five marks and percentage will automatically appear in this.


परंतु इतर मंडळाच्या CBSE / ICSE किंवा इतर राज्यातल्या विदयार्थ्यांना गुण स्वत: भरावे लागतील. यात आय. टी. सारखे विषय वगळून उरलेल्या विषयांचे गुण भरावे लागतील.


But students from other boards like CBSE / ICSE or other states will have to fill the marks themselves. In this, the marks of the remaining subjects will have to be filled, excluding subjects like I. T.

6) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी रु 100 नोंदणी शुल्क विदयार्थी ऑनलाईन पद्धतीने भरतील. ही रक्कम शासनाला मिळेल.


Students will pay a registration fee of Rs 100 online to fill the online application form. This amount will be received by the government.

7) विदयार्थ्यांने जर मेरीट यादी नुसार लागलेल्या कॉलेजला राऊंड मध्ये दिलेल्या तारखांना प्रवेश घेतला नाहीतर त्यास रांऊड 3 (R3) पर्यन्त कोठेही प्रवेश घेता येणार नाही.


If the student does not take admission in the college allotted to him as per the merit list on the dates given in the round, he will not be able to take admission anywhere till Round 3 (R3).


मात्र अतिरीक्त विशेष फेरी मध्ये त्याला प्रवेश घेता येईल. त्यावेळी त्या कॉलेजला जागा शिल्लक असावयास पाहीजे. नसेल तर अन्य कॉलेज निवडावे लागेल.


However, he can take admission in the extra special round. At that time, there should be seats available in that college. If not, he will have to choose another college.

8) विदयार्थ्यांना सायबर कॅफेवर फॉर्म भरता येईल.


Students can fill out forms at cyber cafes.

9) भरलेला ऑनलाईन अर्ज लॉक करणे, डॅशबोर्ड तपासणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.


It is essential to lock the filled online application and check the dashboard. Otherwise, the application will not be accepted.

10) विदयार्थी राऊंड चार पर्यंत घेतलेली शाखा मेरीट नुसार बदलवू शकतो.


The student can change the branch taken up to round four as per the merit.

11) विदयार्थी प्रत्येक राऊंड ला कॉलेजचा पसंती क्रम बदलवू शकतो. (पहील्या वेळेस एका पेक्षा जास्त कॉलेज घेतलेले असणे आवश्यक)


The student can change the order of college preference in each round. (It is necessary to have taken more than one college for the first time preference list.)

12) एका मोबाईल / संगणाकावर कितीही ऑनलाईन अर्ज भरता येतील.


Any number of online applications can be filled out on one mobile/computer.

13) चार राऊंड झाल्यावरच अकरावी कॉलेज अध्ययन कामकाज चालू होईल.


The 11th college studies will start only after four rounds.


माहिती भाग तीन-


प्रवेशाचे टप्पे खालील प्रमाणे राहतील.


The admission stages will be as follows.


1) Zero Round-

कोटा प्रवेश – इन हाउस व मॅनेजमेन्ट कोटा व इतर कोटा प्रमाणे प्रवेश होतील.

Quota Admission – Admission will be done as per In-House and Management Quota and other quotas.


2) R1, R2, R3, R4 राऊंड (तीन किंवा चार प्रवेश फेऱ्या) –

गुणवत्ता, प्राध्यान्यक्रम व आरक्षण धोरणानुसार प्रवेश होतील.

Admission will be done as per merit, priority and reservation policy.


3) अतिरीक्त विशेष फेरी-

प्रवेश न मिळालेल्या सर्वांसाठी खुली, गुणवत्ता व प्राध्यान्यक्रम यानुसार प्रवेश फेरी (Open To All ) राहील.

यात उर्वरीत सर्व प्रवेश तसेच ATKT चे प्रवेश होतील. येथे आरक्षण लागू राहणार नाही.

Additional Special Round-

There will be an Open To All round for all those who have not been admitted, based on merit and priority.

All remaining admissions as well as ATKT admissions will be included in this round. Reservation will not be applicable here.


Registration Website –

Std 11 Admission Portal (Click Here)


Read More –

Parts of Speech

Nouns


Latest Updates about Std. 11 Admission Process-

New Schedule-

New DatesProcess
07June 2025
to
09 June 2025
1.Submission of Objections / correction requests in the Provisional General Merit List (if any) through “Grievance Redressal” in student login

2. Online Redressal of Grievances / Correction requests, by the concerned Deputy Director of Education.

3. Finalization of Grievances Redressal by the concerned Deputy Director of Education.  
11 June 2025FINALIZATION OF GENERAL MERIT LIST (One time activity) and Zero Round allocation for Management/ In House/ Minority Quota
 
12 June 2025
to
14 June
2025
Zero Round -Quota Admission For Minority, Quota, In-House Quota, Management Quota at College Level list will be provided by department.  
17 June 2025(CAP Round-1) Preparation of Merit list of eligible Candidates/allocation. Audit of allocation by the divisional CAP committees.  
26 June 2025(CAP Round-1)

1. Display of Jr. College Allotment list for The Round on the portal.

2. Display of allotted Jr. College details for admission in student login.

3. Display of allotted students list to Jr. Colleges.

4. Display of cut-off list for the Admission Round. (To be published on Portal.  
27 June
2025
to
03 July
2025
1. Students to click (Proceed For Admission) if ok with allotted Junior College

2. Reporting at allotted college for documents verification and payment of prescribed fees etc.& Confirmation of admission in the allotted Junior College by the Student.

3. If a student doesn’t want to take admission in the allotted Junior College should participate in next round.

4. Admission Confirmation, Rejection & Admission cancellation at College Login.

5. Student Registration with their preferences filling will continue for new applicant for NEXT ROUND if only consent given by the student.

Notes : – If a student wants to take admission in the allotted Jr. College, then click on ‘Proceed for Admissionin Student Login, upload required documents and then confirm admission in the allotted Jr. College.

If a student doesn’t want to take admission in the allotted Jr. College can wait for further round.

BUT

Students who have been allotted to his first preference, it is compulsory to take admission in the allotted Jr. College.

If such students failed to take admission or been rejected, they will be blocked for a consequent Regular Round 2 to 4 and can only be considered open for all round onwards.

If a student wishes to cancel his/her confirmed admission, can request concerned Jr. College for this and get the admission cancelled.

Such students who have cancelled their admissions will also be restricted for a consequent Regular Round and can only be considered after the next round.
5 July 2025Display of vacancy for Regular Round 2 (including Quota seats Jr. Colleges)

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे नवीन वेळापत्रक-


82 thoughts on “Std 11 Admission Step by Step Process

    1. Required Information
      1. Personal Details: Full name, date of birth, gender, nationality, etc.
      2. Academic Details: Previous academic records, including Class X marks and board.
      3. Contact Information: Address, phone number, email ID, etc.
      4. Stream Selection: Choose your preferred stream (Science, Commerce, Arts, etc.)

      Steps
      1. Visit the school’s website or portal: Check if the school has an online application portal.
      2. Read the instructions: Understand the requirements and guidelines.
      3. Fill in the details: Provide accurate and complete information.
      4. Upload documents: Attach required documents, such as Class X mark sheet and certificates.
      5. Review and submit: Double-check the information and submit the form.

  1. अकरावी ऑनलाईन प्रवेश निश्चित करने के लिये महत्वपूर्ण

Comments are closed.

You cannot copy content of this page