Educational News – शैक्षणिक वार्ता
Std. 12 Result
Maharashtra State Board
बारावीचा निकाल एप्रिलअखेरीस होणार जाहीर
Class 12th results to be announced by the end of April
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या लेखी परीक्षेचा निकाल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. यंदा परीक्षा नियोजित वेळापत्रकापेक्षा दहा दिवस अगोदर घेण्यात आल्या, त्यामुळे निकाल लवकर जाहीर होणार आहे.
राज्य मंडळाकडून राज्यभरात १० फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
The results of the written examination of Class XII conducted by the State Board of Secondary and Higher Secondary Education will be declared in the last week of April. The results are in the final stage. This year, the exams were conducted ten days ahead of the scheduled schedule, so the results will be declared early.
The state board conducted the written examination for Class 12 across the state from February 10 to March 20. More than 1.5 million students registered for the examination.
See important information about result-
Click below
Senior and Selection Grade Training
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत
दिनांक २० जुलै २०२१ च्या शासननिर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होणेकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
संदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. 2 नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे.
यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विक्रमित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्राप्त) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.
(नोंदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.)
1) प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅब वर क्लिक करून प्रकिया सुरु करावी.
2) वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२६ पर्यंत एकूण १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
3) निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२६ पर्यंत एकूण २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
तथापि काही शिक्षक, मुख्याध्यापक हे दिनांक ०१.०५.२०२६ ते ३०.०४.२०२७ या कालावधीत १२ वर्षे / २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते या कालावधीत सेवानिवृत्त होणार आहेत फक्त असे शिक्षक/ मुख्याध्यापक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात.
4) प्रशिक्षण नोंदणी दिनांक २०.०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २९.०४.२०२६ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत पर्यंत सुरु राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
5) सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे.
6) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत
गट क्र. १-
प्राथमिक गट
(इ.१ली ते ४ थी, इ.१ली ते ५ वी, इ.१ली ते ७ वी, इ.१ली ते ८ वी, इ.६वी ते ८ वी)
गट क्र. २-
माध्यमिक गट
(इ.९ वी, १० वी)
गट क्र. ३-
उच्च माध्यमिक गट
(इ.११वी, १२ वी)
गट क्र. ४-
अध्यापक विद्यालय गट
मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.
7) नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी.
8) प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी.
9) प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ ID. ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी. ज्या प्रशिक्षणार्थ्यांकडे शालार्थ आयडी उपलब्ध आहे. त्यांनी तो आयडी वापरून नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणाध्यर्थ्यांनी जो आयडी वापरून नोंदणी केली आहे त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. जर विभागाने पडताळणीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पात्र केले नाही तर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल व याबाबत केलेला कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही व प्रशिक्षण शुल्क परत केले जाणार नाही.
10) आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदवलेल्या ई-मेल आय.डी. वर OTP येईल. प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. तसेच आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक यांचे verification होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी.
11) नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकार (वरिष्ठ व निवड) यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात.
12) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य, व्हिडीओ, सर्व माहिती www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत,
13) या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील.
14) इंटरनेट बैंकिंग/ क्रेडीट/ डेबिट कार्ड/UPI payment या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल. शुल्क भरत असताना अचूक माहिती भरणे आवश्यक आहे, जेणे करून दुबार शुल्क भरणा होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत दुबार शुल्क परत केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
15) सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit Card, Debit Card. Internet Banking. UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे.
16) एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी. प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवाशुल्क बँकेच्या guideline नुसार प्रशिक्षणार्थीना लागू राहतील याची नोंद घ्यावी.
17) ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीच ते मर्यादित असेल.
18) प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन (रिसिप्ट) पावतीची PDF जतन करून ठेवावी सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इ. तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ई मेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
19) नोंदणी अर्ज भरताना अथवा प्रशिक्षणादरम्यान काही अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डी. वरून gradetraining@maa.ac.in या ई-मेल आय.डी. वर संपर्क करावा.
20) नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांचे संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहिती साठी वेळोवेळी www.maa.ac.in हे संकेत स्थळ पाहावे.
21) प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. तथापि वाचनसाहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल. याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे.
22) पोर्टलच्या देखभाल दुरुस्तीसाठी पोर्टल दररोज रात्री ११.०० ते ०१.०० या कालवधीत बंद राहील.
23) संदर्भ क्रमांक एक व दोनच्या शासन निर्णयानुसार सदर प्रशिक्षण हे शासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ सर्व अनुदानित शाळांमधील शिक्षकांना लागू आहे. विनाअनुदानित / स्वयं अर्थसहाय्यीत शाळेतील शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू नये.
24) आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक, ४२२००२, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे, उच्च शिक्षण संचलनालय, पुणे मनपा, बृहन्मुंबई मनपा, नागपूर मनपा या विभागांचा API / offline data उपलब्ध न झाल्याने या विभागांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

Registration for Senior and Selection Grade Scale Training-
👇
Get Registration Link (Click Here)
See the official letter-
CBSE Std. 10 Result
CBSE declares Std. Tenth result on April 15, 2026.
Students can check their results on the official CBSE websites. The results are also available via the DigiLocker app, UMANG app, and SMS.
Click on the following result link.
Issuing of Consolidated Marksheet and Board Certificate-
१० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना आता मिळणार ‘एकत्रित’ गुणपत्रक व प्रमाणपत्र. नावातही होणार बदल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. 2026 या वर्षापासून इयत्ता १० वी (SSC) आणि १२ वी (HSC) च्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक (Marksheet) आणि प्रमाणपत्र (Certificate) स्वतंत्र न देता, ते ‘एकत्रित’ (Consolidated) स्वरूपात देण्यात येणार आहेत.
The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has announced an important change for students appearing for the February-March 2026 examinations. From this year 2026, the marksheet and certificate will be given to the students of class 10 (SSC) and 12 (HSC) in a ‘consolidated’ format, instead of being given separately.
विद्यार्थ्यांच्या नावाच्या क्रमात बदल
केवळ गुणपत्रक एकत्र होणार नाही, तर विद्यार्थ्यांच्या नावाच्या क्रमातही बदल करण्यात आला आहे.
Not only will the mark sheets be consolidated, but the order of the students’ names has also been changed.
आता गुणपत्रकावर विद्यार्थ्याचे नाव
‘First Name (विद्यार्थ्याचे नाव),
Father Name (वडिलांचे नाव)
Surname (आडनाव)’
या क्रमाने छापले जाणार आहे. या बदलामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या नावाचा क्रम तपासून घेणे आवश्यक आहे.
Now, the student’s name will be printed in the order of
First Name – (Student’s name),
Second Name – (Father’s name)
Third Name – Surname
on the mark sheet.
Due to this change, parents and students need to check the order of their names.
फोटो दुरुस्तीसाठी शेवटची संधी
ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो अस्पष्ट होते आणि ज्यांचे फोटो मुख्याध्यापकांनी दुरुस्त केले आहेत, अशा विद्यार्थ्यांची माहिती पुन्हा अपलोड करणे अनिवार्य आहे. यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर ‘Photo Correction’ ही लिंक सक्रिय करण्यात आली आहे.
It is mandatory to re-upload the information of students whose photos on the admit card (Hall Ticket) were unclear and whose photos have been corrected by the principal. For this, the ‘Photo Correction’ link has been activated on the board’s website.
महत्त्वाचे मुद्दे:
1) एकत्रित दस्तऐवज: गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आता एकाच कागदावर (Consolidated) असतील.
2) नावाचा नवा क्रम: विद्यार्थ्याचे स्वतःचे नाव पहिले, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असेल.
3) दुरुस्तीची जबाबदारी: नावात किंवा फोटोत काही त्रुटी असल्यास शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडून तातडीने दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे सोपे होणार असून, नावाच्या सुसूत्रतेमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेतही मदत होणार आहे.
See the official letter-

MAHA TET- June 2026
The Maharashtra Teacher Eligibility Test (МАНА ТЕТ) 2026 will be held on June 21, 2026, with online applications accepted from March 27 to April 16, 2026.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2026 ही २१ जून २०२६ रोजी आयोजित केली जाईल, ज्यासाठी ऑनलाइन अर्ज २७ मार्च ते १६ एप्रिल २०२६ पर्यंत स्वीकारले जातील.
The exam is pen-and-paper format and conducted by the Maharashtra State Examination Council (MSCE), with admit cards available from June 9 to 21 June 2026.
ही परीक्षा पेन-कागद स्वरूपात आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) द्वारे घेतली जाईल.
प्रवेशपत्रे 9 जून ते 21 जून 2026 पर्यंत डाउनलोड करता येतील.
See More information
Holiday Letter
१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शनिवार दि.०२ मे, २०२६ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
A holiday is being declared for students in all state board schools in the state from Saturday, May 02, 2026.
२) राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
If schools of other boards in the state are operating as per the schedule or if important educational activities are being implemented in such schools, the school administration should take an appropriate decision at their level regarding declaring a holiday for students.
३) पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ मध्य विदर्भ तसेच इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १५ जून, २०२६ रोजी सुरू करण्यात याव्यात.
The next academic year 2026-27, the state board schools in Central Vidarbha and all other regions should start on Monday, June 15, 2026.
४) जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १५ जून, २०२६ ते २९ जून, २०२६पर्यंत सकाळ सत्रात ७.०० ते ११.४५ या वेळेत सुरू करण्यात याव्यात. मंगळवार दि. ३०/०६/२०२६ पासून नियमितवेळेत शाळा सुरू करण्यात याव्यात.
Considering the temperature of Vidarbha in the month of June, after the summer vacation, the state board schools there should be started from Monday, June 15, 2026 to June 29, 2026 in the morning session from 7.00 to 11.45. Schools should be started in regular timings from Tuesday, June 30, 2026.

JEE Main Session 2
The National Testing Agency is conducting the Joint Entrance Examination (Main)-2026 Session-2 at different Centres located in various cities throughout the country and 15 cities outside India. The schedule of release of Admit Cards will be as follows:
जेईई में सेशन २ चे हॉल तिकीट खालील प्रमाणे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध राहतील-
| Date of Exam | Paper | Shift | Date of Release of Admit Card |
| 02 and 04 April 2026 | Paper 1 (B.E./B. Tech) | First Shift (09:00 A.M. to 12:00 Noon) and Second Shift (03:00 P.M. to 06:00 Ρ.Μ.) (Indian Standard Time) | 29 March 2026 |
| 05, 06, 07 and 08 April 2026 | Paper 1 (B.E./B. Tech), Paper 2A (B. Arch), Paper 2B (B. Planning) and Paper 2A & 2B (B. Arch & B. Planning both) | First Shift (09:00 A.M. to 12:00 Noon) and Second Shift (03:00 P.M. to 06:00/06.30 P.M.) (Indian Standard Time) | Will be Released in due course |
The date (s) and City of the examination have already been intimated to all the eligible candidates.
S.S.C and H.S.C Oral, Practical and Internal Evaluation- Filling of Marks
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ चे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण व श्रेणी भरणेसंबंधी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
१. फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना “I.A.MARK” ही लिंक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर Login मधून भरण्याची सुविधा पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

२. माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांकनिहाय ऑनलाईन पध्दतीने नोंदविलेल्या गुणांची Final Printout घेवून त्यावर अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी (आवश्यक त्या विषयाच्या बाबत) व तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबंधीत विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेवून सदर गुणतक्त्यावर मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे.
सदरचे गुणतक्ते विभागीय मंडळाकडे निर्धारित तारखेस प्रचलित पध्दतीप्रमाणे सिलबंद पाकीटामध्ये, पाकीटावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव, Index No घालून तक्त्यात नमूद केल्यानूसार निर्धारित तारखेस विभागीय मंडळाकडे जमा करावयाचे आहेत. तसेच गुणतक्त्याची एक प्रत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे.
See official Letter-
Online Filling of Marks-
Using institute login, teachers can fill the online marks.
Keep marks confidential.
Use the following link to fill the marks-
User ID and password are essential.
MHT – CET 2026
MHTCET Update
MHTCET PCM आणि PCB साठी नोंदणी करण्याचे वेळापत्रक जाहीर.
सुरवात : 10 जानेवारी 2026
शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2026
आवश्यक कागदपत्रे:
- मोबाईल नंबर
- Email ID
- Apaar ID ( तयार करून घ्यावा )
- आधार कार्ड ( मोबाईल नंबर लिंक असलेले)
- पासपोर्ट साइज फोटो + Live Photo Capture
- सही
फॉर्म फी : 2 attempt साठी:
Open Category : 2600 Rs
Reserved Category: 2000 Rs
यावेळी परीक्षा 2 वेळा होत असल्याने सर्वांनी एकाच वेळी दोन्ही attempt चे फॉर्म भरून घ्यावे.
सर्वांनी आपला Apaar ID तयार करून ठेवावा आणि आपल्या आधार ला मोबाईल नंबर लिंक आहे याची खातरजमा करून घ्यावी
See more information-
MHT – CET Registration (Click Here)
CET Exams 2026
CET Cell announced the tentative dates of different CET for the year 2026.
| Name of CET Exam | Tentative Exam Date |
| MAH-M.P.Ed. CET-2026 | 24-03-2026 |
| MAH-M.P.Ed- Field Test (Offline) | 25-03-2026 |
| MAH-M.Ed CET-2026 | 25-03-2026 |
| MAH-M.HMCT CET-2026 | 25-03-2026 |
| MAH-B.Ed (General & Special) & B.Ed ELCT-CET-2026 | 27-03-2026 to 29-03-2026 |
| MAH-MCA CET-2026 | 30-03-2026 |
| MAH-L.L.B.3 Yrs. CET-2026 | 01-04-2026 to 02-04-2026 |
| MAH-B.P.Ed.-CET-2026 | 04-04-2026 |
| MAH-B.P.Ed-Field Test (Offline) | 05-04-2026 to 07-04-2026 |
| MAH-B.Design CET-2026 | 05-04-2026 |
| MAH-MBA/MMS-CET-2026 | 06-04-2026 to 08-04-2026 |
| MAH-B.Ed.M.Ed. (Three Year Integrated Course)-CET)-2026 | 09-04-2026 |
| MAH-AAC CET-2026 | 10-04-2026 |
| MAH-MHT CET (PCM Group) -2026 | 11-04-2026 to 26-04-2026 |
| МАН- МНТ СET (PCB Group) -2026 | 11-04-2026 to 26-04-2026 |
| MAH- B.HMCT /BCA/BBA/BMS/BBM CET-2026 | 28-04-2026 to 30-04-2026 |
| MH-DPN/PHN-CET 2026 | 05-05-2026 |
| MH Nursing CET 2026 | 06-05-2026 to 07-05-2026 |
| MAH-LLB (5-Years) CET-2026 | 08-05-2026 |
Second CET-
| Name of CET Exam | Tentative Exam Date |
| MAH-MBA/MMS-CET-2026 | 09-05-2026 |
| MAH-MHT CET (PCB Group) -2026 | 10-05-2026 to 17-05-2026 |
| МАН- МНТ СET (PCM Group) -2026 | 10-05-2026 to 17-05-2026 |
See the official letter-

Read More-
दहावी व बारावी लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
राज्यातील दहावी व बारावी महाराष्ट्र स्टेट बोर्ड लेखी परीक्षेचे वेळापत्रक दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी जाहीर झाले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
| अ.क्र. | तपशील | लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी |
| १) बारावी लेखी परीक्षा | उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण, व्दिलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा) | मंगळवार, दि. १० फेब्रुवारी, २०२६ ते बुधवार, दि. १८ मार्च, २०२६ |
| बारावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा | प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्नात्यक्षिक परीक्षेसह) | शुक्रवार, दि. २३ जानेवारी, २०२६ ते सोमवार, दि. ०९ फेब्रुवारी, २०२६ |
| २) दहावी लेखी परीक्षा | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा | शुकवार, दि. २० फेब्रुवारी, २०२६ ते बुधवार दि. १८ मार्च, २०२६ |
| दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा | प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) | सोमवार, ०२ फेब्रुवारी, २०२६ ते बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६ |
See the official letter –
Download the Time Table for the Official Website-


H.S.C. Hall Ticket – 2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्रावार्य, शिवक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यधिक प्रमाणपत्र (१.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्याथ्यांना अनिताईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या उन्न माध्यमिक प्रमाणपत्र (६.१ रकी) परीक्षेची प्रवेश (Hall Ticket) अनिलाईन (Online) पप्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार दिनांक १२/०१/२०२६ पासून Admit Card या link download करण्याकरिता उपलब्ध होतील.
Date to download Hall Tickets by respective colleges-
12 January 2026
See official Letter-
