Std 11 Admission Process – See online admission process
Year 2026-2027
शासन आदेशानुसार मुंबई (MMRDA), पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका सोबतच इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दती राज्यभर राबविण्याबाबत शासन मान्यता देण्यात आली आहे.
As per the government resolution, the government has approved the implementation of Std 11 Central Online Admission System across the state, along with the Municipal Corporations of Mumbai (MMRDA), Pune, Pimpri-Chinchwad, Amravati, Nagpur and Nashik.
शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्यात येणार आहेत.
From the academic year 2026-2027, admission to Std 11 in all recognized higher secondary schools/junior colleges in the state of Maharashtra will be done through the central online admission system.
कोणते कनिष्ठ महाविद्यालय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवतील ?
Which junior colleges will implement online admission process?
सन 2026-2027 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवणे आवश्यक राहील.
From the academic year 2026-2027, it will be mandatory for all recognized higher secondary schools/junior colleges in the state of Maharashtra to implement the online admission process.
Important Updates-
Std. XI Admission 2026-2027
The student registration process will begin from 10th April 10:00 AM till 30th April 5:00 PM. For registration the following things are essential-
विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया १० एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होईल आणि ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५:०० वाजता संपेल. नोंदणीसाठी खालील बाबी आवश्यक आहेत.
Essential things-
1) दहावी चे हॉल टिकेट (परीक्षा रिसिट) झेरॉक्स
2) आधार कार्ड झेरॉक्स
3) मोबाईल फोन नंबर
4) ई मेल आयडी (असल्यास)
5) आई चे नाव
6) सेल्फ डिक्लरेशन (स्वयं घोषणापत्र) – खाली पीडीएफ आहे.
7) जातीचा दाखला (लागू असल्यास)
8) नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट (लागू असल्यास)
9) अपंग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
10) रु. 100 + GST शुल्क
Registration Link
👇

OR
Student Registration ✍️ (Click Here)

See the official letter-

Latest Guidelines-
1) सन 2026-2027 मध्ये महाराष्ट्र राज्यातील राज्यमंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक विद्यालये/ कनिष्ठ महाविद्यालयांतील इ.11 वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील.
In the year 2026-2027, admissions for Class 11 in all higher secondary schools/junior colleges affiliated to the state board in the state of Maharashtra will be done through a central online method.
2) ज्या विद्यार्थ्यांना राज्यातील राज्यमंडळ संलग्न इ.11 वी मध्ये प्रवेश घ्यावयाचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी या प्रणालीच्या माध्यमातून अर्ज करावा.
Only students who wish to take admission in class 11th affiliated to the state board should apply through this system.
3) अन्य मंडळाशी संलग्न विद्यालयात प्रवेशासाठी संबंधित विद्यालयांशी संपर्क साधावा.
For admission to schools affiliated to other boards, please contact the relevant schools.
4) अन्य मंडळाच्या शाळांमधून इ.10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यमंडळ संलग्न इ.11 वी मध्ये प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांना या प्रणालीद्वारे अर्ज करता येईल.
Students who have passed Class 10 from schools of other boards and want to take admission in Class 11 affiliated to the state board can apply through this system.
5) शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेनुसार व निकषांनुसार ऑनलाईन पध्दतीने करण्यात येईल. ऑनलाईन प्रणाली व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने शाळांना प्रवेश करता येणार नाही.
The admission process will be done online as per merit and criteria till the last student is admitted. No admission will be possible to schools through any other means other than the online system.
See official Letter-
Required Documents for the Admission-
इयत्ता – 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे
१) इयत्ता 10 वीचा शाळा सोडण्याचा दाखला.
२) इयत्ता 10 वी चे गुणपत्रक.
३) विद्यार्थ्यांचा आधार कार्ड.
४) राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला.
५) वडिलांचा/ आईचा उत्पन्नाचा दाखला. (उत्पन्नाचा दाखला 2025-2026)
६) विद्यार्थ्यांचे वय अधिवास (डोमासाईल) प्रमाणपत्र.
७) ज्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉनक्रिमिनलची आवश्यकता आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी नॉनक्रिमिनल प्रमाणपत्र.
८) स्व प्रमाणपत्र.
९) अपंग प्रमाणपत्र (लागू असल्यास).
१०) प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र (लागू असल्यास).
११) क्रीडा प्रमाणपत्र (लागू असल्यास).
१२) स्वतंत्र सैनिक पाल्य प्रमाणपत्र (लागू असल्यास).
१३) माजी सैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास).
१४) पालकांची बदली असल्यास बदली आदेश.
टीप:- उपरोक्त कागदपत्रे इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेसाठी आवश्यक आहेत.
Required Documents for Std. 11 Admission-

Self Declaration form–
If students don’t have any of the following documents at the time of registration, they can upload the filled self declaration form assuring that they will provide the required documents when they come to take admission in college.
नोंदणीच्या वेळी विद्यार्थ्यांकडे खालीलपैकी कोणतेही कागदपत्र नसल्यास, ते महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आल्यावर आवश्यक कागदपत्रे सादर करतील याची हमी देणारा भरलेला स्वयं-घोषणा अर्ज अपलोड करू शकतात.
Documents-
1) इ.10वी शाळा सोडल्याचा दाखला
Std.10 School Leaving Certificate
2) इ.10वी गुणपत्रक
Std.10th Mark Sheet
3) जातीचा दाखला/प्रमाणपत्र
Caste Certificate/Certificate
4) उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचे NCL प्रमाणपत्र
NCL Certificate for Advanced and Non-Advanced Category
5) अन्य आरक्षणाबाबत प्रमाणपत्र
Other Consent Certificate
6) स्वयंघोषणापत्र (अल्पसंख्याक)
Self-Declaration Form (Minority)
Download the self declaration form-
See Government Resolution-
Date- 25 Feb. 2025
How will the process start?
Every Higher Secondary school / Junior College has to register college giving all information of college along with the intake capacity of students for Arts, Science, Commerce faculty.
प्रत्येक उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाने महाविद्यालयाची नोंदणी करावी लागेल आणि कला, विज्ञान, वाणिज्य विद्याशाखेतील विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आणि महाविद्यालयाची सर्व माहिती द्यावी लागेल.
See the User Manual for Registration-
New information about admission process-
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया :-
राज्यातील सर्व क्षेत्राकरीता उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय यांचेशी संलग्न सर्व शाखांमधील इयत्ता 11 वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतुदी लागु राहतील.
राज्यातील अल्पसंख्यांक दर्जासह अन्य सर्व उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील इयत्ता 11 वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतूदी लागु राहतील.
शैक्षणिक सत्र 2026-2027 पासून राज्यातील राज्यमंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे इयत्ता 11 वी चे प्रवेश केंद्रीय पध्दतीने व ऑनलाईन प्रणाली द्वारा करण्यात येईल.
खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालय यांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे वरीष्ठ कार्यालयांना उपलब्ध करून देणे, विहित मुदतीत माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे, इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अनुषंगिक कामकाज विहित मुदतीत करणे, याबाबत शाळा स्तरावरील कामकाज पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी खाजगी व्यवस्थापनाची असेल.
विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान शाखांपैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल. विद्यार्थाना कोणत्याही एका शाखेकरीता अर्ज करता येईल.
See Government Resolution-
Date- 6 May 2025
Read More-
Official Website for Std 11 Admission-
इयत्ता 10 वीचा ऑनलाईन निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी प्रवेशाकरीता प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
After the online results of Std 10 are declared, students will be provided with the facility to fill the priority list for Class 11 admission.
सर्व प्रवेश इयत्ता 10 वीच्या गुणांच्या आधारे करण्यात येतील.
All admissions will be made on the basis of class 10th marks.
राज्य मंडळ संलग्नित इयत्ता 10 वी मधील विषयांच्या उच्चतम 5 विषयांचे गुण गुणवत्तेकरीता विचारात घेण्यात यावेत.
The marks in the highest 5 subjects in class 10th affiliated to the state board should be considered for merit.
राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांच्या माध्यमिक स्तरावरील इयत्ता 10 मधील माहिती व तंत्रज्ञान किंवा तत्सम विषय वगळता अन्य 5 विषयांमधील उच्चतम गुण हे गुणवत्तेकरीता विचारात घेण्यात येतील.
The highest marks in 5 subjects other than Information and Technology or similar subjects in Class 10 of secondary level of boards other than the State Board will be considered for merit.

Std.11 Online Admission Process-
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठीचे अधिकृत संकेतस्थळ लवकरच सुरू केले जाईल.
The official website for Class XI admissions will be available soon.
Official Website for Std. 11 Registration
Available Soon
Time Table – Std 11 Admission Process
अकरावी प्रवेशासाठी वेळापत्रक-
| विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रोफाईल तयार करणे | Available soon |
| विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरणे. | Available soon |
Online Admission process Fee for students-
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शुल्क-
Rs. 100 (Non – refendable)
Important Information for Students-
१) मोबाईलवर वापरण्यायोग्य संकेतस्थळ उपलब्ध होणार.
२) विद्यार्थ्यास लॉगिन आयडी व पासवर्ड ऑनलाइन वेळी ऑनलाइन मिळणार तसा संदेश दिलेल्या मोबाईलवर येईल.
३) विद्यार्थ्यांना अर्ज आपल्या घरूनच भरता येणार. अर्ज भरणे माहिती पुस्तिका वाचणे प्रवेश प्रक्रियेची शुल्क भरणे असे विविध कामकाज करता येईल.
४) कागदपत्रे अपलोड करून अर्ज ऑनलाईनच प्रमाणीत होणार.
५) प्रवेश प्रक्रिया शुल्क ऑनलाईनच भरता येईल.
६) शाळा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालय यांना फोनवरून संपर्क साधता येईल.
७) अडचणींच्या निराकरणासाठी कॉल सेंटर अथवा हेल्पलाइन व ऑनलाइन शंका समाधान सुविधा.
८) प्रत्येक कारवाईची सूचना एस. एम. एस. द्वारे मिळेल.
९) प्रत्येक फेरीचे कट ऑफ गुण पाहता येतील.
Reservation-
संविधानिक / सामाजिक आरक्षणांतर्गत राखीव जागा (बिगर अल्पसंख्यांक शाळा)
| क्र. | प्रवर्ग | आरक्षित जागा |
| १) | अनुसूचित जाती (SC) | १३% |
| २) | अनुसूचित जमाती (ST) | ०७% |
| ३) | विमुक्त जाती -अ (VJ-A) | ०३% |
| ४) | भटक्या जमाती ब (NT-B) | २.५% |
| ५) | भटक्या जमाती क (NT-C) | ३.५% |
| ६) | भटक्या जमाती ड (NT-D) | ०२% |
| ७) | विशेष मागास प्रवर्ग (SBC) | ०२% |
| ८) | इतर मागासवर्गीय (OBC) | १९% |
| ९) | आर्थिक दुर्बल घटक (EWS) | १०% |
| १०) | खुल्या प्रवेशासाठी | ३८% |
कोटा निहाय राखीव जागा
| क्र. | कोटा | अल्पसंख्यांक संस्थांच्या उच्च माध्यमिक विद्यालय | बिगर अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय |
| १) | इन हाऊस कोटा | १०% | १०% |
| २) | व्यवस्थापन कोटा | ५% | ५% |
| ३) | अल्पसंख्यांक कोटा | ५०% | लागू नाही |
समांतर आरक्षण / विशेष आरक्षण प्रवर्ग
| क्र. | विशेष आरक्षण | अल्पसंख्यांक संस्थांच्या उच्च माध्यमिक विद्यालय | बिगर अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय |
| १) | महिला | ३०% | ३०% |
| २) | दिव्यांग अपंग | ४% | ४% |
| ३) | प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त | ५% | ५% |
| ४) | अ) बदलीने आलेल्या राज्य शासन/ केंद्र शासन/ खाजगी क्षेत्रातील कर्मचारी यांचे पाल्य. ब) आजी माजी सैनिकांच्या पत्नी/ पाल्य/ स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य. क) आंतरराष्ट्रीय स्वरावरील स्पर्धामध्ये विजेते सहभागी खेळाडू विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदक विजेते खेळाडू | ५% | ५% |
| ५) | अनाथ मुले (खुल्या प्रवर्गातून) | १% | १% |
| ६) | उर्वरित जागा (शुद्ध प्रवर्ग) | ५५% | ५५% |
शालेय शुल्क –
१) उच्च माध्यमिक विद्यालयातील अनुदानित तुकडील साठी शासन नियमाप्रमाणे शुल्क आकारले जाते.
२) विनाअनुदानित स्वयंअर्थसाईट कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांची शुल्क संबंधित व्यवस्थापना मार्फत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनी यमन अधिनियम 2011 नुसार निश्चित केले जाते त्यामुळे वेगवेगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे शुल्क वेगवेगळे असू शकते.
३) अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयातील विनाअनुदानित तुकडींसाठी उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावरून शुल्क आकारले जाते त्यामुळे एकाच विद्यालयात अनुदानित विनाअनाने तुकड्यांसाठी वेगवेगळे शुल्क असू शकते.
४) द्विलक्षी व माहिती तंत्रज्ञान या अतिरिक्त विषयांचे शुल्क वेगळे असेल.
५) शुल्काबाबत अधिक तपशील संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात संपर्क साधून मिळवता येईल.
ATKT प्राप्त विद्यार्थ्याच्या प्रवेशाबद्दल-
1. इयत्ता 10 वी मध्ये 1 किंवा 2 विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना इ. 11 वी प्रवेशासाठी शासनाने ATKT (Allowed to Keep Terms) सवलत लागू केलेली आहे.
2. ही सवलत केवळ महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळाचा इयत्ता अकरावी मध्ये (इयत्ता दहावी सर्व विषय उत्तीर्ण होईपर्यंत) तात्पुरता प्रवेश दिला जातो.
3. ATKT धारक विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशासाठी अर्ज करण्याची सोय इयत्ता दहावी (जुलै मधील) पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर (साधारणपणे विशेष फेरी 1 नंतर) दिली जाईल.
4. ज्या विद्यार्थ्यांना ATKT सवलत मिळालेली आहे त्यांना 11 वी प्रवेशासाठी अर्ज भरता येतील. (इंग्रजी विषयात ATKT असेल तरीही) भविष्यात इंग्रजी विषय उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.
5. ATKT धारक विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी मध्ये विज्ञान शाखा घ्यावयाची असल्यास इयत्ता दहावी मध्ये विज्ञान विषयात 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे.
6. अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनाही त्या मंडळाने अशा प्रकारची (eg. Compartmental) सवलत लागू केली असल्यास ती त्याच मंडळाच्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठी लागू असेल. राज्य मंडळातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अन्य मंडळाची ATKT सवलत लागू होणार नाही. त्यामुळे अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना स्पष्ट उत्तीर्ण झाल्याशिवाय राज्यमंडळ इयत्ता 11 वी प्रवेशासाठी अर्ज करता येणार नाही.

according to gr it says that hsvc admission is to be done offline, it will be better if the process is explained on your level. candidates filling form online and if no choice to select hsvc subject what should be the process. can a candidate change the faculty to hsvc.pl clarify.
Useful for Std. 11
11th admission
,
according to gr it says that hsbc admio is to be done offline,it will be better if the process is expected on your level. candidates filling form online and if no choice to select hsbc subject what should be the process. can a candidate change the faculty to hsvc. Pl clarify.
Admission kb hoga
11th admission science
11th admission
yes
wow so cute
11th commerce english admission
11 science Janata vidyalaya
teacher
11th admission
Useful information
Good
11th
science rashtriy Vidyalay adgaon