Diploma in School Management– know more
DSM-
This is a Distance education course affiliated to Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik.
हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न असलेला दूरस्थ शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे.
Diploma In School Management – Eligibility for Head of the school.
डी.एस.एम.पदविका घेऊन मुख्याध्यापक/ उपमुख्याध्यापक/ उपप्राचार्य पदासाठी पात्र व्हा.
This course helps the candidate to-
1) Know various concepts of management at school level.
शालेय स्तरावरील व्यवस्थापनाच्या विविध संकल्पना जाणून घेणे.
2) Know various trends in management.
व्यवस्थापनातील विविध प्रवाह किंवा प्रवृत्तींची माहिती करून घेणे.
3) Develop knowledge, attitude & skills required for effective management in school.
शाळेतील प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक ज्ञान, दृष्टिकोन आणि कौशल्ये विकसित करणे.
4) Do research in their field to solve problems.
समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या क्षेत्रात संशोधन करणे.
5) Know importance of Total Quality Management.
‘सर्वंकष गुणवत्ता व्यवस्थापन’ (Total Quality Management) चे महत्त्व जाणून घेणे.
6) Become a knowledgeable Head of the school.
शाळेचे ज्ञानसंपन्न प्रमुख बनणे.
7) Understand the real work of the Head of the school.
शाळाप्रमुखाचे प्रत्यक्ष कार्य समजून घेणे.
8) To develop leadership
नेतृत्वगुण विकसित करणे.
9) To get ideas how to work in school.
शाळेतील कामकाजाबाबतच्या कल्पना मिळवणे.
10) To become efficient and active member of the school.
शाळेचा कार्यक्षम आणि सक्रिय सदस्य बनणे.
11) To fulfill the eligibility to become a Head Master of any school.
कोणत्याही शाळेचे मुख्याध्यापक होण्यासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणे.
Duration of completing the course- One Year एक वर्ष
Minimum 1 year and maximum 3 years
The duration of the School Management Diploma course is a minimum of one year, and it must be completed within a maximum of three years.
Thereafter, the learner must seek fresh admission in the year following the expiration of their registration by paying the full fees applicable for that year.
शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम कालावधी किमान एक वर्ष असून जास्तीतजास्त तीन वर्षांत पूर्ण करणे आवश्यक आहे.
त्यानंतर अध्ययनार्थीला नोंदणी संपेल त्या वर्षी पुन्हा त्या त्या वर्षांचे पूर्ण शुल्क भरून नवीन प्रवेश घ्यावा लागेल.
Exam Process- परीक्षेचे स्वरूप

Guidance Sessions-
अभ्यासक्रम शिकणे
Interactive sessions- 10 (Saturday and Sunday)
Held in – B.Ed. college.
Candidates have to choose the respective B. Ed college in their premises.
उमेदवारांना त्यांच्या परिसरातील संबंधित बी.एड. महाविद्यालय निवडावे लागेल.
Eligibility for Admission
प्रवेश पात्रता
1. A graduate of a UGC-recognized university
यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर व्यक्ती
OR
2. A person holding an appointment letter as Headmaster / Deputy Headmaster.
मुख्याध्यापक / उपमुख्याध्यापक असे नियुक्तपत्र असलेली व्यक्ती
Medium – Any one
Marathi,
English
or
Hindi
Fees –
7710/-
Can be changed. See YCMOU website for it.
Official Website-

Read More-
Importance of DSM-
A Diploma in School Management is crucial because it bridges the gap between traditional teaching and modern educational leadership.
‘स्कूल मॅनेजमेंट’मधील (शाळा व्यवस्थापन) पदविका अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती पारंपरिक अध्यापन पद्धती आणि आधुनिक शैक्षणिक नेतृत्व यांच्यातील दरी सांधण्याचे काम करते.
It equips educators and administrators with the specialized skills needed to run schools efficiently, handle institutional finances, navigate educational laws, and elevate overall student learning outcomes.
हा अभ्यासक्रम शिक्षणतज्ज्ञ आणि प्रशासकांना शाळांचे कार्यक्षमतेने संचालन करण्यासाठी, संस्थात्मक आर्थिक बाबी हाताळण्यासाठी, शैक्षणिक कायद्यांचे पालन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची एकूण फलनिष्पत्ती उंचावण्यासाठी आवश्यक असलेली विशेष कौशल्ये प्रदान करतो.
Benefits to Head of the School-
1) How to control school
2) Managing staff
3) Conflict Resolution
4) Time and Resource Management Policy Execution
DSM is useful to become-
1) School Administrator
2) Principal or Vice Principal
3) Head master
4) Educational Consultant
5) Educational Leadership Roles in NGOs
Objectives of the curriculum
शिक्षणक्रमाची उद्दिष्टे
(1) To introduce learners to the fundamental concepts of management.
अध्ययनार्थ्यांना व्यवस्थापनातील मूलभूत संकल्पनांचा परिचय करून देणे.
(2) To acquaint learners with modern schools of thought in educational management.
अध्ययनार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक व्यवस्थापन विचारप्रवाहांची ओळख करून देणे.
(3) To develop the knowledge, attitudes, and skills necessary for effective management among learners
अध्ययनार्थ्यांना परिणामकारक व्यवस्थापनासाठी आवश्यक ते ज्ञान, अभिवृत्ती, कौशल्ये विकसित करणे.
(4) To encourage learners to undertake educational innovations and experiments.
शैक्षणिक नवोपक्रम व प्रयोग करण्यासाठी अध्ययनार्थ्यांना प्रवृत्त करणे.
(5) To encourage learners to apply new skills in management.
अध्ययनार्थ्यांना व्यवस्थापनात नवीन कौशल्ये वापरण्यास प्रवृत्त करणे.
(6) To foster a research-oriented perspective among learners regarding problems encountered in daily tasks and to encourage them to conduct action research.
अध्ययनार्थीत दैनंदिन कार्यातील समस्येकडे पाहण्याचा संशोधकाचा दृष्टिकोन वृद्धिंगत करणे आणि कृतिसंशोधन करण्यास प्रवृत्त करणे.
(7) To introduce learners to the concept of quality management in education.
अध्ययनार्थीला शिक्षणातील गुणवत्ता व्यवस्थापनेच्या संकल्पनेचा परिचय करून देणे.
अभ्यासक्रम
(१) EDU- 199 : शैक्षणिक व्यवस्थापन: नवा दृष्टिकोन
(२) EDU-113 : शैक्षणिक व्यवस्थापन
(३) EDU-114 : कार्यालयीन व्यवस्थापन
(४) EDU-115 शालेय आर्थिक व्यवस्थापन
(५) EDU-116 : शाळेची रचना व भौतिक सुविधा
(६) EDU-117:
विद्यार्थी सेवा/कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास
(७) EDU-118 शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधांचे व्यवस्थापन
(अ) अंतर्गत कार्य
(१) स्वाध्याय
(आ) Project
कृतिसंशोधन प्रकल्प अहवाल
Government Resolution for Essential Qualification to become Headmaster or Vice Principal-
मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदावर फ्दोव्रतीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील अर्हताप्राप्त शिक्षकांना लागू करण्याबाबत शाषण आदेश.
मूल्यमापन प्रक्रिया
एकूण मूल्यमापन
या शिक्षणक्रमासाठी एकूण ८०० गुणांचे मूल्यमापन असेल. त्यात अंतर्गत मूल्यमापनास २०% भारांश आणि बहिःस्थ मूल्यमापनास ८०% भारांश असेल.
(क) अंतर्गत मूल्यमापन
१) प्रत्येक अभ्यासक्रमावरील ४ स्वाध्याय २० गुण या प्रमाणे
७ अभ्यासक्रमावरील २८ स्वाध्याय
– १४० गुण
२) कृतिसंशोधन कार्य अहवाल
– ५० गुण
मौखीक परीक्षेद्वारे कार्यपडताळणी
– ५० गुण
(ख) बहिःस्थ मूल्यमापन
अंतिम लेखी परीक्षा ८० पैकी (७ अभ्यासक्रम)
– ५६० गुण
एकूण
१४० + १०० + ५६० = ८०० गुण
कृतिसंशोधन अहवाल
कृतिसंशोधन अहवालासाठीच्या १०० गुणांपैकी २५ गुण अंतर्गत परीक्षकांनी व २५ गुण बहिःस्थ परीक्षकांनी दिलेले असतील आणि ५० गुण मौखिक परीक्षेसाठी असतील.
आपण केलेले कृतिसंशोधन नवीन दृष्टिकोनानुसार लेखन करून मांडावे.
साधारणपणे ९ ते १० हजार शब्दांत हे अहवाल लेखन टाईप करून अभ्यासकेंद्रावर मार्चपूर्वी तीन प्रतीत सादर करावे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कृतिसंशोधनाचे मूल्यमापन अभ्यासकेंद्रावर करण्यात येईल.
त्यावेळी तात्त्विक अभ्यासक्रमासंबंधी आपण केलेल्या स्वाध्याय कार्याची पडताळणी करण्यात येईल.
उत्तीर्णतेचे नियम
शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक अभ्यासक्रमात आणि कृतिसंशोधनात प्रत्येकी ४०% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे
Admission –
Candidates must fill out the admission application online. The following documents must be scanned and uploaded along with the application:
1. Proof of date of birth
2. Degree mark sheet and certificate
3. Appointment order (if serving as Headmaster/Deputy Headmaster)
प्रवेश –
उमेदवाराने प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. या अर्जासोबत पुढील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहे.
१. जन्मतारखेचा पुरावा
२. पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
३. मुख्याध्यापक / उपमुख्याध्यापक असल्यास नियुक्तीचे आदेश.
Important-
University fees must be paid online. A maximum of 60 admissions will be granted at each center.
If admission is not secured at the study center, or if the study center closes due to unavoidable circumstances, the course must be completed at a study center designated by the University.
विद्यापीठ शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. प्रत्येक केंद्रावर कमाल ६० प्रवेश देण्यात येतील.
अभ्यासकेंद्रावर प्रवेश न झाल्यास किंवा अपरिहार्य कारणास्तव अभ्यासकेंद्र बंद झाल्यास विद्यापीठाने निर्धारित केलेल्या अभ्यासकेंद्रावर सदर शिक्षणक्रम पूर्ण करावा लागेल.
The scanned documents will be verified after the admission process is completed. Final admission will be granted thereafter.
प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्कॅन केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर अंतिम प्रवेश करण्यात येईल.
It is mandatory for candidates to attach the necessary documents required for course eligibility.
शिक्षणक्रमाच्या पात्रतेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे उमेदवाराने जोडणे अत्यावश्यक आहे.
If the scanned documents are illegible, admission will be denied, and the university fees paid by the candidate will not be refunded.
स्कॅन कागदपत्रे वाचनीय नसल्यास प्रवेश नाकारण्यात येईल व उमेदवाराने भरलेले विद्यापीठ शुल्क परत दिले जाणार नाही.
The learner must pay the study center fees to the study center and retain the payment receipt.
Once admission is confirmed, the learner will be issued a permanent registration number.
अध्ययनार्थ्याने अभ्यासकेंद्राचे शुल्क अभ्यासकेंद्राकडे भरावे व ते भरल्याची पोच ठेवावी.
A list of eligible learners, categorized by study center, will be made available online on the portal.
प्रवेश निश्चित झाल्यानंतर अध्ययनार्थीस कायम नोंदणी क्रमांक देण्यात येईल. अभ्यासकेंद्रनिहाय पात्र अध्ययनार्थांची यादी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर देण्यात येईल.

Get more information from-
DSM – Admission Process for 2026-27
Admission Process for the year 2026-2027 is not yet started. Candidates need to check UCMOU website for it. They can register themselves online and submit the application for to the respective B .Ed college.
वर्ष २०२६-२०२७ साठी प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. उमेदवारांनी त्याबाबत UCMOU च्या संकेतस्थळावर माहिती पहावी. ते ऑनलाइन नोंदणी करू शकतात आणि संबंधित बी.एड. (B.Ed.) महाविद्यालयात अर्ज सादर करू शकतात.
