Ideal Teacher Award – Maharashtra
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024- 25
Krantijyoti Savitrimai Phule State Teacher Appreciation Award 2024- 25
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024- 25 साठी ऑनलाइन स्वनामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Ideal Teacher Maharashtra Award Registration Started-
ऑनलाइन रजिस्ट्रेशनसह स्व:नामांकन भरण्याचा कालावधी:
दिनांक 18 जुलै 2025 सकाळी 10.00 वाजले पासून ते 31 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत.
पात्रता:
राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक यांना ऑनलाइन स्व:नामांकन करता येईल.
Important Instructions-
प्रस्तावासाठीच्या आवश्यक अटी–
1) शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक.
2) मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशानासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक .
3) शिक्षक /मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान १० वर्षे आवश्यक .
4) शिक्षकाचे /मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल.
5) विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.
6) शिक्षकांनी केलेल्या लगतच्या मागील ५ वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाद्वारे करण्यात येईल.
7) प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत.
8) शिक्षकांच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
9) एकदा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.
10) एक शिक्षक कोणत्याही एकाच प्रवर्गासाठी अर्ज करण्यास पात्र असेल. एकापेक्षा जास्त संवर्गात अर्ज केल्यास त्यांचे अर्ज निवड प्रक्रियेतून रद्द केला जाईल.
11) शिक्षकांनी सादर केलेली माहिती खोटी अथवा प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्यास आवेदन रद्द करण्यात येईल.
12) शिक्षकांनी स्वतःचे तीन रंगीत फोटो व स्व: प्रमाणपत्र सादरीकरणावेळी जमा करावेत.
ऑनलाइन स्व:नामांकन भरण्यासाठी लिंक:
👇
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन.२०२४ –२५
To be filled by the teacher Applicants, for State Teacher Award २०२४-२५ .
(अंतिम दिनांक- ३१ जुलै, २०२५ )
हा फॉर्म पूर्ण भरल्यानंतर आपली फाईल शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद कार्यालयात मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.
तरी इच्छुक व पात्र शिक्षकांनी वरील लिंकवर जाऊन आपले ऑनलाइन स्व:नामांकन भरावे. असे आवाहन शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.
पुरस्कार संवर्ग (यातील फक्त एकाच संवर्गात अर्ज कर्ता येईल)
1) प्राथमिक
2) माध्यमिक
3) आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)
4) थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार (फक्त महिलांसाठी)
5) विशेष शिक्षक – कला/क्रीडा
6) दिव्यांग शिक्षक/ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक
7) स्काऊट / गाईड शिक्षक
Read More-
G.R for Krantijyoti Savitrimai Phule State Teacher Appreciation Award 2024- 25
